पाणी चोरीमागे कुणाचा हात? कटलरी मार्केटच्या टेरेसवर 50 हजार लिटर पाणीसाठा
एकीकडे पाणीकपातीच्या झळा नागरिकांना बसत आहेत, मात्र अनधिकृतपणे उभ्या असलेल्या इमारतीला राजरोसपणे पाणीपुरवठा केला जात आहे. सी विभागातील जांजीकर स्ट्रीट कटलरी मार्केट या सातमजली इमारतीच्या टेरेसवर पाच हजार लिटरच्या 10 पाण्याच्या टाक्या अनधिकृतपणे ठेवलेल्या आहेत. यामागे नेमका पुणाचा वरदहस्त आहे? पाणी खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने स्थापत्य समितीच्या बैठकीत शुक्रवारी केली.
कटलरी मार्केटच्या टेरेसवर 10 टाक्यांमधून पाणीचोरी होत असल्याचा हरकतीचा मुद्दा शिवसेना नगरसेवक अनिल कदम यांनी स्थापत्य समितीच्या बैठकीत उपस्थित केला. कटलरी मार्केट ही इमारत अनधिपृत असताना एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाणीचोरी होत असल्याची गंभीर बाब अनिल कदम यांनी निदर्शनास आणून दिली. टेरेसवर ठेवलेल्या 10 टाक्यांमधून प्रत्येकी पाच हजार लिटर याप्रमाणे 50 हजार लिटर पाणी चोरले जात आहे. एकीकडे पाणीटंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे, तर दुसरीकडे कटलरी मार्पेटसारख्या इमारतींच्या टेरेसवर पुणाच्या संगनमताने अनधिपृतपणे पाणी साठवले जात आहे आणि पालिकेचे आर्थिक नुकसान केले जात आहे, असा सवाल त्यांनी केली. पाणी खात्याच्या संबंधित अधिकाऱयांची चौकशी करावी, अशी मागणी कदम यांनी केली. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, असे निर्देश स्थापत्य समिती अध्यक्ष यामिनी जाधव यांनी दिले.
Comments are closed.