मुंबईत रहिवासी इमारतीला आग; दोन लहान मुलं, वृद्ध महिलेसह आठ जणांची सुखरूप सुटका
मुंबईत शनिवारी 21 नोव्हेंबर रोजी रात्री उशीरा एका रहिवासी इमारतीला आग लागली. मुंबई सेंट्रल येथील गिलदार लेन परिसरात रात्री 12 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. रहिवासी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट पसरले आणि काही रहिवासी घरांमध्ये अडकले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या मोहिमेत दोन लहान मुलांसह आठ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.
कथा | दक्षिण मुंबईतील निवासी इमारतीला लागलेल्या आगीत आठ जण बचावले, अग्निशामक जखमी
दक्षिण मुंबईतील एका चार मजली निवासी इमारतीला रविवारी पहाटे आग लागल्याने दोन मुलांसह आठ जणांना वाचवण्यात यश आले असून अग्निशमन दलाचा एक अधिकारी जखमी झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाचा: https://t.co/tf6hDbRmMB
— प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@PTI_News) 22 नोव्हेंबर 2026
बातमी अपडेट होत आहे-
Comments are closed.