अंत्यसंस्कारासाठी जायचे कसे? स्मशानभूमीच्या मार्गावर रिसॉर्टची सुरक्षा भिंत कोसळली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कळंब गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर एका रिसॉर्टची संरक्षक भिंत कोसळल्याने अंत्यसंस्कारासाठी जायचे कसे, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून या कोसळलेल्या भिंतीचे दगड तसेच ढिगारा तसाच पडून आहे. स्थानिक प्रशासन नेमके करते तरी काय, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.

कळंब ग्रामस्थांचा सवाल

कळंब ग्रामपंचायत हद्दीतील ‘द रिड्स रिसॉर्ट’ची सुरक्षा भिंत जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळली. या भिंतीलगतच कळंब गावाची स्मशानभूमी असून भिंतीचे अवशेष स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले आहेत. सुमारे चार हजार लोकवस्ती असलेल्या कळंब गावासाठी ही एकमेव स्मशानभूमी आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी रात्री-अपरात्री जाणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वाहने जायलाही जागा नाही

अंत्यविधीसाठी येणारी वाहने तसेच इतर कामकाजासाठीची वाहने स्मशानभूमीपर्यंत नेणेही कठीण झाले आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ हर्षल बदे यांनी आवाज उठवला आहे. चार महिने उलटूनही कोसळलेल्या भिंतीचे अवशेष हटविण्यात आलेले नाहीत. ग्रामसेवक, ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी नेमके कोणत्या घटनेची वाट पाहात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Comments are closed.