सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या

मुंबई : राज्यातील प्रशासकीय वर्तुळात शिपाई ते तहसीलदारांपर्यंतच्या अधिकाऱ्यांवर जरब बसवत एसीबीने धाडसत्र सुरू केल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयनेही (CBI) प्राप्त तक्रारीनुसार धाड टाकत जीएसटी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहात अटक केली. 22 डिसेंबर रोजी आलेल्या तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना मुंबईच्या CGST ऑडिट-1 च्या अधीक्षकांना सीबीआय अधिकाऱ्यांनी अटक केली. सीबीआयने 22 डिसेंबर 2025 रोजी एका खासगी कंपनीच्या संचालकाच्या लेखी तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल केला, ज्यामध्ये सीजीएसटी, मुंबईबाई). कार्यालयाच्या अधीक्षकांनी बेकायदेशीर लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता.

याप्रकरणीताल आरोपी सीजीएसटी अधीक्षकांनी 26 नोव्हेंबर रोजी तक्रारदाराच्या कंपनीचे ऑडिट केले. तक्रारदाराने असा आरोप केला होता की आरोपीने आपल्या खासगी कंपनीविरुद्ध 98 लाख रुपयांचा कर बुडवल्याची खोटी धमकी दिली होती. तसेच, हा प्रश्न “मिटवण्यासाठी” 20 लाख रुपयांची लाच देखील मागितली होती. तडजोडीअंती आरोपीने तक्रारदाराच्या कंपनीचे कथित कर दायित्व कमी करण्याच्या बदल्यात 17 लाख रुपये लाच मागितली. त्यापैकी, ठरलेल्या लाचेच्या रकमेतील पहिला टप्पा 22 डिसेंबर रोजी देण्यास बजावले होते. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, सीबीआयने सापळा रचून आरोपी जीएसटी अधिकाऱ्यास 5 लाख रुपयांची लाच (लाचेचा अंशतः भाग म्हणून) स्वीकारताना रंगेहात पकडले.

सीबीआयने घरी टाकली धाड

सीबीआयने आरोपीच्या मुंबई येथील निवासस्थानी छापे टाकले, ज्यामध्ये 18 लाख 30 हजार रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली. आरोपीला या रकमेबाबत कुठलेही ठोस स्पष्टीकरण देता आले नाही. तसेच, एप्रिल 2025 रोजी 40 लाख 30 हजार लाख रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे कागदपत्रे आणि जून 2024 रोजी 32.10 लाख रुपयांची आणखी एक मालमत्ता खरेदी केल्याचंही समोर आलं. त्यानंतर, आरोपी सरकारी कर्मचाऱ्याच्या कार्यालयातही सीबीआयने झडती घेतली असता, खासगी कंपनीसाठी तयार केलेल्या ऑडिट अहवालाबाबत डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी, सीबीआय अधिकाऱ्यांकडून अधिकचा तपास सुरू आहे.

हेही वाचा

शिक्षक भरती घोटाळ्यात आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला अटक, 12 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका

आणखी वाचा

Comments are closed.