बैठकांचं सत्र, मध्यरात्रीपर्यंत खलबतं; एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या घरी महायुतीची तिसरी बैठक
ठाणे : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election 2026) अनुषंगाने शिवसेना आणि भाजप युतीच्या जागावाटपावर मोठ्या प्रमाणात एकमत झाले आहे. जवळपास 210 जागांवर सहमती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, अजूनही 17 जागांवर तिढा कायम असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. तर हा उर्वरित तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या उच्चपोस्ट केले नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र आणि मधलारात्रीपर्यंत खलबतं होताना दिसत आहे. अशातच युतीची तिसरी बैठक शुक्रवारी एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या ठाण्याच्या घरी पुन्हा एकदा बैठक पार पडली आहे. या बैठकीला एकनाथ शिंदेश्रीकांत शिंदे, उदय सामंत, भाजप नेते रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, नरेश म्हस्के उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकीला ठाणेकल्याण डोंबिवली, नवी मुंबई महापालिकेतील युतीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. सोबतf आणि मुंबईसाठी देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. युतीचा जागा वाटपाचा तिढ्ढा पूर्णपणे अद्याप सुटलेला नाही. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखा निघून जात असल्याने आता मॅरॉथॉन बसाकांचे सत्र सुरू असून यात लवकरच शेवटचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तर आज आणि उद्या दोन दिवसात जागा फायनल करून जागा वाटप जाहीर करायचे आणि उमेदवारांना फॉर्म भरायचे प्रेशर देखील याता युतीच्या नेत्यांवर आहे.
Municipal Corporation Election 2026 : जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित
दुसरीकडे मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर बसणार असा चंग भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं बांधलाय. तर अजित पवारांना बाजूला ठेवून युती करणाऱ्या या दोन पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय, अशी देखील माहिती आहे. त्यानुसार भाजप 140 तर शिंदेंची शिवसेना 87 जागा लढणार असल्याचं समजतंय. जेवढ्या लवकर उमेदवारांची यादी जाहीर करू तेवढी बंडखोरी होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून आता भाजप आणि शिवसेना उमेदवारांची यादी कधी जाहीर करते हे पाहावं लागेल.
Thane Election : ठाण्यामधला जागावाटपाचा तिढा अजूनही कायम, भाजपकडून 40 ते 45 जागांची मागणी
मुंबईत जागावाटपाचं गणित सुटलं असलं तरी मुंबई शेजारी असलेल्या ठाण्यामधला जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. भाजपकडून 40 ते 45 जागांची मागणी केली जातेय. मात्र शिवसेनेला हा आकडा मान्य नाही. त्यामुळे निवडणूक प्रभारी निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे धाव घेतलीय. आता या तिन्ही नेत्यांमध्ये जे काही ठरेल त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत देखील बैठक होणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे यावर नेमका काय आणि कधी शिक्कामोर्तब होती हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडेविधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. कारण भाजपसोबत जागावाटपाच्या चर्चांमध्ये त्या कमी पडत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. पुण्यात शिवसेनेकडून 35 जागांची मागणी करण्यात आलीय. मात्र भाजपनं 15 जागाच देऊ केल्यानं आता शिवसेनेनं निर्णायक इशारा दिलाय.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.