मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही पण अजितदादांनी ते पाळलं नाही, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खदखद
देवेंद्र फडणवीस : अजित दादांना दिल्लीत आमच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला जायचं असेल तर ते जाऊ शकतात. त्यांना विमान सुद्धा देण्याची व्यवस्था मी करेन, तिकीटही काढून देईल, जोपर्यंत आमच्या वरिष्ठांना भेटतात तोपर्यंत मी आनंदी असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही पण अजित दादांनी ते पाळलं नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
पुण्यनगरी सातत्याने आम्हाला यश देते म्हणून सुरुवात आणि सांगता येथे केल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पुणे, मुंबईनाशिक, नागपूर सह सगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आम्हाला मत देणार अशी लोकांचे मानसिकता बनली आहे. त्यामुळे कोणी काही बोललं काही सांगितलं तरी मानसिकता बदलणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. लोकांनी भाजपाला निवडून द्यायचं ठरवलं आहे असे ते म्हणाले.
मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही पण अजित दादांनी ते पाळलं नाही
मी शब्द पाळणाऱ्यांपैकी आहे. मी आधीच सांगितलं होतं की आमची युती होणार नाही, मात्र आम्ही मैत्रीपूर्ण लढत करु असे मुख्यमंत्री म्हणाले. कोणाच्या विरोधात बोलणार नाही पण अजित दादांनी ते पाळलं नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. अजित पवार माझ्याच वरिष्ठांकडे माझी तक्रार करणार ना. विरोधकांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न असेल, पुण्यात अजित पवार आमचे विरोधक होते असे मुख्यमंत्री म्हणाले. हिंदीतली एक म्हण आहे कब बाप मरेगा और कब बैल बटेंगे असंही ते म्हणाले. अजून काही झालं नाही त्यावर इतका बोलणं योग्य नाही. दोन महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. 27 महानगरपालिकेत विरोधात लढत आहेत. त्याच्यावर इतकी चर्चा का करायची? असा सवालही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
नता कोणाच्या बाजूने आहे हे निवडणुकीत कळलेलं आहे
काल मी पुराव्यासहित उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्ती कशी आणली. ते दाखवलेला आहे. राज ठाकरेंचा आता बंधुशी पटायला लागले त्यामुळे माझ्याशी बोलण्यापेक्षा बंधुंशी बोलायला पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले. आपल्या भाषेवर संकट आणणारे तुमचे बंधू आहेत. त्यांच्याच सोबत तुम्ही युती करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेने मला तीन वेळा मुख्यमंत्री बनवलं. जनता कोणाच्या बाजूने आहे हे निवडणुकीत कळलेलं आहे. त्यामुळं राज ठाकरेंना मी बसवलेला वाटत असेल तर त्यात हरकत नाही असंही फडणवीस म्हणाले.
राज ठाकरेंचे सगळे नगरसेवक चोरुन नेण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केल
उद्धव ठाकरे यांनी मत चोरीच्या संदर्भात बोलू नये, त्यांच्यावर नगरसेवक चोरीचा आरोप आहे. राज ठाकरेंचे सगळे नगरसेवक चोरुन नेण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. चोरी करण्याची प्रवृत्ती ज्यांची असेल, लोकांच्या मताने निवडून आलेले नगरसेवक त्यांनी चोरायचे हे गंभीर आहे. लाडक्या बहिणीचा हप्त्यावरुन, आता काही लोकांच्या पोटात दुखत आहे. आयोगाने जे सांगितलं ते आम्ही मान्य करु असे मुख्यमंत्री म्हणाले. पैसे आम्ही 16 तारखेनंतर देऊ असेही फडणवीस म्हणाले. राज ठाकरेंनी इतके आरोप केले आहे की 15 तारखेनंतर त्यांच्याकडून यादी मागवून घेतो असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.