मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबई : राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे (Election) निकाल जाहीर झाले आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मी सर्व महापालिकामध्ये प्रचारला जाऊ शकलो नाही. चंद्रपूरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक जिंकून आले, परभणीमध्येही आम्हाला चांगलं यश मिळालं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात शिवशक्तीला ज्यांनी ज्यांनी मतदान केलं त्यांचे धन्यवाद करतो, आभार मानतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुंबईबाबी). महापालिकेतील निकालावर समाधान व्यक्त केले आहे. तसेच, अत्यंत घाणेरड्या पद्धतीने ही निवडूक झाली, साम-दाम-दंड-भेद विसरुन त्यांनी निवडणूक लढवली. मुंबईमध्ये आमचा महापौर व्हावा ही इच्छा होत, आजही आहे. पण, आम्ही बहुतमताचा आकडा गाठू शकलो नाही. मात्र, आमच्या यशाने सर्वांना घाम फोडला, असेही ठाकरेंनी म्हटले.
विधानसभेला शिवाजी पार्कवर त्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या, आत्तासुद्धा आमच्या सभेला शिवाजी पार्क फुलून गेलं पण त्यांच्या सभेला गर्दी नव्हती. मग, आमच्या सभेला गर्दी होते पण मतं मिळत नाही, यांना रिकाम्या खुर्च्यांनी मतदान केलं का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
शिवसेना संपवण्याचा त्यांनी पूर्ण प्रयत्न केला, आमचे अर्धे आमचे नगरसेवक त्यांनी गळाला लावले पण आता ते गाळात गेलेआहेत. भाजप पक्ष हा कागदावर आहे पण जमिनीवरती नाही, माझे नगसेवक जे निवडून आले ते साधे आहेत. मुंबईकराकडून आम्हाला जास्त अपेक्षा होती, भरघोस आशीर्वाद देतील असं वाटलं होतं. आम्हाला मोठा आशीर्वाद दिला नसला तरी जे आशीर्वाद दिले ते ठीक आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी निकालावर समाधान व्यक्त केलं.
देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर होईल
मुंबई महापालिकेमध्ये आमचे लोकप्रतिनिधी जातील, यांनी तिजोरी कशी खाली केली याचा भांडभोड मुंबई करांशी आमचे प्रतिनिधी करतील. देवाची इच्छा असेल तर महापौर आमचा होईल, मेवाची नाही, थोडा फार फरक आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.
एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
हॉटेलमध्ये ठेवलेले नगरसेवक जे निवडून आलेले आमचे किती आहेत? त्यांना विचारा हॉटेलमध्ये का ठेवलं. आता, फोडणाऱ्यांना आपले लोक फुटण्याची भीती आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंना टोला लगावला. त्यांचा विजय डागाळलेला आहे, ज्यांची मदत घेऊन महापौर बसत आहे, त्यांना लाज वाटली पाहिजे. गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे, आपण काय करतोय. बाळासाहेबांची शिवसेना म्हणताय, त्यांचे विचार घेऊन तुम्ही जाताय, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.
शिवसेना भवनचा वॉर्ड जिंकून आणला
शिवसेना भवन वॉर्ड आम्ही जिंकून आणला, मनसे शिवसेना कोणाला कोणाची मदत झाली असं नाही. आम्ही एक दिलाने लढलो, राज ठाकरेंसोबत जिल्हा परिषद निवडणूक लढवायला काय हरकत आहे? एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी मी आधीच बोललो, असे म्हणत शिवसेना-मनसे युतीवरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं.
पक्ष, चिन्ह गेलं तर अस्तित्व काय?
काँग्रेसचे उमेदवार निवडून आले तर चांगलं आहे, तुमच्यासोबत असते तर म्हणजे आत्याला मिशी का नाही? असं विचारण्यासारखं आहे, असे म्हणत जर तर च्या प्रश्नावर काय बोलावं असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईत आमचे 54 नगरसेवक फोडले, तरीही आमचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत. आता, 21 आणि 22 तारखेला सुनावणी आहे, पक्ष आणि चिन्ह निर्णय होईल. त्यावेळी, जर पक्ष चिन्ह यांचं गेलं तर काय अस्तित्व राहिल? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.