शरद पवारांची नात होणार नागपूरची सून; दोघांचंही शिक्षण परदेशात, सुप्रिया सुळेंनी शेअर केले लेकीच

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची नात तर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सदानंद सुळे (Sadanand Sule) यांची मुलगी रेवती सुळे आता नागपूरची सून होणार आहे. नागपूर येथील एका व्यावसायिकाचा मुलगा सारंग लखानी (Sarang Arun Lakhani) यांच्याशी रेवती यांचे लग्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांचे चिरंजीव विजय सुळे (Vijay Sule) यांनी काल (मंगळवारी) सोशल मीडियावर अभिनंदनपर संदेश पोस्ट करून ही ‘गुड न्यूज’ दिली आहे. यात रेवती आणि सारंग यांचा फोटो शेअर करीत, “बहीण आणि मेहुणे यांचे अभिनंदन” अशा कॅप्शनसह हार्ट आणि इमोजी मेसेज टाकून सर्वाना धक्का दिला आहे.  त्यानंतर आज सुप्रिया सुळे यांनी रेवतीसह सारंग, त्यानंतर सदानंद सुळे आणि सारंग यांचा फोटो शेअर केला आहे.

रेवती आणि सारंग या दोघांचेही परदेशात झालंय शिक्षण

रेवती सुळे यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी मिळवली. बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी प्रथमच आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. तर सारंग लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंग लखानी त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली फर्म विश्वराज ग्रुपमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. ते उत्तम बॅडमिंटनपटू असून, त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहे.

गडकरी-फडणवीसांची मध्यस्थी असल्याची चर्चा

रेवती सुळे आता नागपूरची सून होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याची माहिती आहे.

सारंग अरुण लखानी नागपूरचे

सारंग अरुण लखानी नागपूरचे आहेत. त्यामुळे रेवती सुळे नागपूरची सून होणार आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्रमुख्यमंत्र्यांना त्रास होतो देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याची सूत्रांचे माहिती आहे. (Revati Sule Marriage Sarang Arun Lakhani)

सुप्रिया सुळेंचा होणारे जावई सारंग लखानी कोण आहेत?

सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंग अरुण लखानी हे एक चांगले बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.

कोण आहेत रेवती सुळे?

सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुलं आहेत. रेवती सुळे हिने प्रतिष्ठित London School of Economics मधून पदवी पूर्ण केली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी प्रथमच आपल्या आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. (Revati Sule Marriage Sarang Arun Lakhani)

आणखी वाचा

Comments are closed.