बीडमध्ये भीषण अपघात, धुलवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी

बीड : देशभरात आज होळीच्या सणाचा उत्साह पाहायला मिळत असून घरोघरी सकाळीच होळी पेटवून पूजन करण्यात आलं. तर, संध्याकाळी गावागावात मोठ-मोठ्या होळी पेटवल्या जाणार आहेत. त्यानंतर, सर्वत्र उद्या धुलीवंदन साजरे केले जाईल, मुंबईसह मोठ्या शहरात उद्यापासूनच रंगपंचमीची धूम पाहायला मिळेल. त्याच पार्श्वभूमीवर ग्रामीण महाराष्ट्रात धुलीवंदनाची तयारी सुरू आहे. बीड (Beed) जिल्ह्यात धुलीवंदन साजरे करायला निघालेल्या तरुणांच्या कारला भीषण अपघात (Accident) झाल्याने एक जण जागीच ठार झाला असून तिघे जखमी झाल्याची घटना घडली. या अपघाताच्या घटनेनं धुलीवंदन सणाला गालबोट लागलं आहे.

बीड जिल्ह्यातील बीड-शिरूर मार्गावरील रायमोह गावाजवळ कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. कृष्णा मुळे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव असून कृष्णा आपल्या मित्रांसोबत धुलीवंदनाचा सण साजरा करण्यासाठी वॉटर पार्कला निघाला होता. मात्र, बीड-शिरुर मार्गावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलट्या खात थेट विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने ही गाडी विहिरीत पडली नाही. परंतु या भीषण अपघातात कृष्णा मुळे हा युवक जागीच ठार झाला. तर, कारमधील प्रसाद खोले, यश पेंढारे आणि अन्य एक जण जखमी आहेत.

दरम्यान, या कारच्या पाठीमागे त्यांच्याच मित्रांची आणखी एक गाडी होती, त्यामुळे मागील कारमधील मित्रांनी जखमींना तातडीने बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

हेही वाचा

दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही, समोर आलं महत्त्वाचं राज’कारण’

आणखी वाचा

Comments are closed.