एक दिवसाचा कायदा बदला, खरातला सुया टोचून टोचून….., भाजपच्या मंत्र्याचा संताप

चंद्रपूर/नागपूर: “नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा आणि स्त्री शक्तीचा अपमान केला आहे. अशा नराधमाला कोर्टाच्या माध्यमातून न्याय न देता, एक दिवसासाठी कायदा बदलून भर चौकात उभं करावे आणि सर्वांनी एक-एक सुई टोचून टोचून त्याचा अंत करावा,” अशा शब्दांत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.

कायद्यावर विश्वास, पण कृत्ये पाहून संताप!

मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले की, “मी कायद्यावर विश्वास ठेवणारा एक सुजाण नागरिक आहे, पण जेव्हा टीव्हीच्या माध्यमातून मी अशोक खरातचे अघोरी कारनामे पाहतो आणि ऐकतो, तेव्हा माझ्यासारख्या माणसाच्याही मनात येते की याला कायद्याची कोणतीही सवलत मिळू नये. ‘नो कोर्ट, नो कचेरी’; याला फक्त भर चौकात सुया टोचून फासावर लटकवले पाहिजे.”

“हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, जिथे स्त्रीला देवाच्या बाजूचे स्थान दिले जाते. मात्र, या भोंदू बाबाने स्त्रियांचा अवमान करून प्रत्यक्ष देवाचा आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी देशातील सर्व भोंदू बाबांना निरोप गेला पाहिजे की—’याद रखो तुम्हारी मौत पक्की है!”

विज्ञानाच्या युगात अघोरी कृत्ये?

मुनगंटीवार यांनी खंत व्यक्त केली की, २१ व्या शतकात आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराजांच्या विचारांचे शिक्षण शाळांमधून देतो. मात्र, अशा प्रकारचे भोंदू बाबा समाजाला तर त्रास देतातच, पण हिंदू धर्मालाही बदनाम करण्याचे काम करत आहेत.

रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, “जेव्हा गंभीर आरोप होतात, तेव्हा कोणतीही चौकशी प्रभावित होऊ नये म्हणून लोक राजीनाम्याची मागणी करतात. यामध्ये काहीच चूक नाही आणि संबंधितांनी राजीनामा दिलाच पाहिजे.”

अशा घटना घडतात, आरोप होतात तेव्हा कोणतीही चौकशी होऊ नये म्हणून राजीनाम्याची मागणी लोकं करतात, त्यात चूक काहीच नाही. संबंधितांनी राजीनामा दिलाच पाहिजे, असं ते रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबद्दल बोलले. अशा व्यक्तीला कोर्टाच्या माध्यमातून न्याय न देता चौकामध्ये उभं करून प्रत्येकाने एकेक सुई टोचत, साऱ्या सुया टोचत टोच त्याचा मृत्यू झाला पाहिजे असं माझ्या मनात येतं. त्याचंही कारण म्हणजे त्याने केलेली अघोरी कामं. किती वाईट कृत्य तक्याने केली आहेत. खरेतर खरातला कायद्याने शिक्षा व्हावी, असे मला वाटत असले तरी अशा नराधमांना चौकात उभे करून सुया टोचून टोचून मारले पाहिजे, असा संताप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा

Comments are closed.