रूपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स, अंजली दमानियांनी कॉल रेकॉर्ड्स काढले, मंत्र्यांचीही ना

अशोक खरात प्रकरणी अंजली दमानिया : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याचे अनेक काळे कारनामे बाहेर येत असून महिला लैंगिक शोषणासोबतच आर्थिक फसवणुकीचे देखील गुन्हे आता समोर येत आहे. याचदरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज पत्रकार परिषद घेत अशोक खरात प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत. अशोक खरात याच्या सीडीआरची मला कॉपी मिळाली आहे. मी याबाबतची माहिती पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली. (Anjali Damania On Ashok Kharat CDR)

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणायच्या खरात माझे गुरू आहेत. रूपाली चाकणकर यांचे 177 कॉल्स हे अशोक खरात यांना झाले. प्रतिभा चाकणकर यांचे 236 कॉल्स अशोक खरातला (Ashok Kharat) झाले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांचे 17 कॉल्स अशोक खरातला नॉर्मल मोबाईलवरून झाले. यामध्ये 10 इनकमींग, 7 आऊट गोईंग होते. यात साधारण 21 मिनिटं अशोक खरात आणि एकनाथ शिंदे यांच्यात संभाषण झालं, असं गंभीर आरोप अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला. 1 एप्रिल 2025 पासून ते 17 मार्च 2026 पर्यंतचा अशोक खरातचा सीडीआर अंजली दमानियांच्या हाती लागला आहे. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे कॉल्स झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे अशोक खरातला 8 कॉल्स आहे.  मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा एक कॉल अशोक खरातला झाला, असा दावा अंजली दमानिया यांनी केला. (Ashok Kharat Calls Record)

अशोक खरातसोबत कोण कितीवेळ बोललं?, सगळं सांगितलं- (Anjali Damania Ashok Kharat CDR)

अशोक खरातसोबत सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं याची माहिती घेतली. यामध्ये तृप्ती खरात पहिलं नाव आहे. दुसऱ्या नंबरवर रूपाली चाकणकर आहे. 33 हजार 727 सेकंद रुपाली चाकणकर अशोक खरातशी बोलल्या होत्या. आताच्या घटकेला यांना अटक होऊन पूर्ण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. इतका वेळ कुणीही कुठल्याही गुरूंशी बोलत नाही. दिपक लोंढे तिसरं नावं आहे. दिपक लोंढे यांचे 189 कॉल्स झाले होते. 30 हजार 529 सेकंद कॉल्स झाले. कतार, युएस, व्हर्जीन आयलंड, अशा देशातूनही अशोक खरातला फोन आले आहेत.

पंतसंस्थेच्या अनेक खात्यांमध्ये खरात वारसदार- (Ashok Kharat Case)

कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत एकूण 57 खातेदारांनी 100 खाती उघडली आहेत. या प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून अशोक खरात याचे नाव असल्याची माहिती आहे. या खात्यांवर सुमारे 60 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. यामध्ये आठ खाती ही खरात कुटुंबीयांची आहेत. यामध्ये चाकणकर नावाचेही खातेदार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या सर्व खात्यांशी अशोक खरात याचा मोबाईल नंबर जोडलेला आहे. खरात वारसदार असलेली खाती कुणाच्या नावे आहेत याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी नावे सांगण्यास नकार दिला. मात्र प्रतिभा चाकणकर व आणखी एक चाकणकर अशा दोन नावांनी खाते असल्याची माहिती आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही नाव प्रतिभा आहे.

अंदली दमानियांची खळबळजनक पत्रकार परिषद, VIDEO:

संबंधित बातमी:

Ashok Kharat Case Nashik Crime News: भोंदू अशोक खरातच्या लग्नाचा किस्सा; हळदीवेळी शर्टच काढत नव्हता, हादरवणारं कारण समोर

Ashok Kharat Case Nashik Crime News: Silent मोड, काही प्रश्न विचारल्यास एकच उत्तर; कायदेतज्ज्ञांचे सांगितली यामागील अशोक खरातची रणनीती

आणखी वाचा

Comments are closed.