नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी मा
निदा खान नाशिक शारीरिक छळ प्रकरण: नाशिकच्या नामांकित कंपनीमधील महिला अत्याचार छळवणीत आणि धर्मांतर प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका आणि देवळाली पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल (Nashik Physical Harassment Case) करण्यात आला आहे. याप्रकरणी सात जणांना अटक केली असून मुख्य सूत्रधार असलेली निदा खान मात्र गेल्या 20 दिवसांपासून फरार आहे. कंपनीमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून निदा खान (Nida Khan) काम बघत होती. आरोपींना दररोज कामाचे नियोजन देण्यासाठी होणाऱ्या मीटिंगमध्ये हिंदू मुलींची छळवणूक आणि त्यांच्यावर धर्मांतराचा तगादा लावण्यासाठी निदा खान ऑपरेशन डिपार्टमेंट म्हणून या सर्व गोष्टी घडवून आणत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे. (Nashik IT Company Crime News)
गेल्या 20 दिवसांपासून निदा खान फरार आहे. निदा खानच्या मागावर पोलिसांचे तीन पथक रवाना करण्यात आले आहे. मात्र अद्यापही तिचा ठाऊक ठिकाणा लागत नसल्याचं पाहायला मिळत आहे. कंपनीतील तरुणींना आणि महिलांना मानसिक छळवणूक आणि लैंगिक अत्याचार होताना धर्मांतर करण्याचा मुख्य उद्देश ठेवून अनेक कारनामे या निदा खानच्या सांगण्यावरून घडत होत्या अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. कंपनीची HR अश्विनी चैनाणी हिला पोलिसांनी अटक केली आणि तिची कसून चौकशी केली असता. या प्रकरणात निदा खान ही हे सर्व घडवून आणत असल्याचं पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी सहा पुरुष आरोपी तर दोन महिला आरोपी असल्याने हे प्रकरण दररोज एका व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून घडवून आणले जात होते हा धक्कादायक उलगडा झाल्याने या प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. मात्र धर्मांतर सारखा गंभीर प्रकार एका नामांकित कंपनीमध्ये घडवणारी ही निदा खान नेमकी कोण? आणि निदा खानची अटक का महत्त्वाची?, याबाबत जाणून घ्या… (Nashik Physical Harassment Case)
कोण आहे निदा खान? (Who Is Nida Khan Nashik Case)
- बोट- निदा एजाज खान
- वय- 26 वर्ष
- कंपनीतील टीम लीडरची प्रमुख आणि कंपनीत काम करणाऱ्या मुलींची टार्गेट टीम प्रमुख म्हणून काम करत होती.
- 2021 पासून निदा खान ही कंपनीत काम करत होती.
- नाशिकच्या द्वारका परिसरात निदा खान हिचे माहेर असून तिचे पती एका खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती.
- कंपनीत नवीन महिला किंवा तरुणी कामाला आल्यानंतर त्यांना या आरोपीकडून ट्रेनिंग देण्याची शिफारस निदा खान करत
- आरोपींच्या प्रेमात आणि ठरवलेल्या धर्मांतर षड्यंत्रात मुली अडकवण्यासाठी तिची मुख्य भूमिका
- या प्रकरणात आर्थिक मदत लागत असेल तर इतर आर्थिक मदत आरोपींना आवश्यक नुसार करत होती.
- निदा खान तिच्या अटकेमुळे या संपूर्ण प्रकरणातील मास्टरमाइंड नेमका कोण आहे, याचा खुलासा होणार असल्याने तिची अटकेची कारवाई महत्त्वाची
- या संपूर्ण प्रकरणाची सूत्रधार म्हणून निदा खान ही असल्याने पोलिसचे तीन पथक निदा खानच्या मागावर
निदा खानचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचा देखील संशय- (Nashik Physical Harassment Case)
निदा खान ही एका सर्वसामान्य घरातील असल्याची माहिती आहे. तिचे लग्न 2021-22 मध्ये एजाज खान सोबत झाल्याची माहिती असून एका नामांकित महाविद्यालयात तिचे शिक्षण ही पूर्ण झाल्याची माहिती आहे. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून एका नामांकित कंपनीमध्ये निदा ही सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करत असल्याचा देखील समोर आले आहे. मात्र या प्रकरणात निदा खानवर मुख्य सूत्रधार म्हणून आरोप झाल्याने या प्रकरणात तिची अटक ही नाशिक पोलिसांसाठी आणि या प्रकरणातील उलगडा होण्यासाठी सर्वाधिक निर्णय होणार आहे. निदा खानचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचा देखील संशय तपास यंत्रणेकडून व्यक्त केला जातोय.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.