रविवारी आणि गुरुवारी देवी येते, शरीरातील भूत उतरवतो…; मुंबईतील भोंदूबाबाचा धक्कादायक प्रताप स

भोंदूबाबा मुंबईत: एकीकडे नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण (Ashok Kharat) गाजत असताना दुसरीकडे मुंबईतील मालाडमध्ये भोंदूबाबाच्या प्रतापांमुळे (Bhondubaba In Mumbai) स्थानिक हैराण झाले आहेत. मालाडमध्ये राहणारा हा भोंदू बाबा “आपल्या अंगात रविवार आणि गुरुवार या आठवड्यातल्या दोन दिवशी देवी येते आणि मी अनेकांच्या शरीरातील भूत उतरवतो” असं म्हणत जादूटोणा करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या सगळ्याचे पुरावे स्थानिकांनी दिंडोशी पोलिसांना दिले असून हे सगळे प्रकार त्यांनी तात्काळ थांबावेत यासाठी पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी केली आहे. यासाठी 65 ते 70 स्थानिकांनी आपल्या सहीचं पत्र पोलिसांना दिला आहे. या भोंदू बाबा नेमकं काय करतो? ज्याने हे स्थानिक त्रस्त झाले आहेत. (Bhondubaba In Mumbai)

भोंदूबाबाचे प्रताप, जादूटोणा, भूत उतरवणे  ही सगळी प्रकरण फक्त खेडेगावात-ग्रामीण भागात नाही तर मुंबईतल्या शहरी भागात सुद्धा होत असल्याचं आता पाहायला मिळत आहे. कारण अंधश्रद्धेला खतपाणी देणाऱ्यांची संख्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढत चाललेली पाहायला मिळत आहे. मालाड पूर्वेला राहणारा रिदम पांचाळ हा व्यक्ती रविवार आणि गुरुवार लोकांची सेवा करतो असं म्हणत जादूटोणा करत असल्याचा आरोप त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिकांनी केला आहे. मागील दोन  वर्षांपासून  दर आठवड्याच्या रविवारी आणि गुरुवारी अघोरी पूजा करतो आणि त्याला अंगात देवी आल्याचे म्हणत इतरांच्या अंगातील भूत उतरवतो असं सांगतो. आतापर्यंत त्याच्या घरी, घराच्या समोर अशा प्रकारच्या पूजा किंवा अशा प्रकारचे प्रताप तो करत होता. मात्र 4 एप्रिलला त्याने महापालिकेच्या गार्डनमध्ये शेकडो लोकांना बोलून आपली पूजा करत उघडपणे भूत उतरण्याच्या नावाखाली जादूटोण्याचा प्रकार  केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचे काही फोटोज व्हिडिओसुद्धा आता समाज माध्यमांमध्ये आले आहेत. (Mumbai Crime News)

भोंदूबाबा म्हणतात, हीच देवीची पूजा- (मुंबईतील भोंदूबाबा)

भोंदूबाबाचा सदर सगळा प्रकार, ह्या अघोरी विद्याचे व्हिडिओ या स्थानिकांनी दोन आठवड्यापूर्वीच पोलिसांना दिले आणि स्थानिकांनी सह्या करत यावर अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी केली. कारण त्याच्या या आघोरी पूजेमुळे स्थानिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. वारंवार सांगून सुद्धा तो आपला हा कार्यक्रम थांबवत नसल्याने स्थानिकांना पोलिसांमध्ये धाव घ्यावी लागली. ही एक प्रकारे देवीची पूजा असल्याचं हा भोंदूबाबा त्याला या सगळ्या आरोपावर प्रश्न विचारल्यावर सांगतो. मात्र, या पूजेसाठी हा भोंदूबाबा जो साहित्य आपल्याकडे येणाऱ्या लोकांना सांगतो ते साहित्य बघून ही नेमकी कुठली पूजा असा प्रश्न तुम्हालाही पडू शकतो.

पूजेसाठी कोणकोणते साहित्य वापरतो?

बकऱ्याचा कलेजा
काळे कापड
लाल कापड
स्मशान राख
लिंबू
टाचणी
दारूची बाटली
कुंकू
सिगारेट
(चार रस्ते मिळतात तिथे ठेवायचं )

भोंदूबाबा म्हणतो, मी पूजा करुन लोकांची सेवा करतो- (Bhondubaba In Mumbai)

पूजेचे साहित्य बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा या पूजेची भीती वाटेल आणि हा एक प्रकारे ब्लॅक मॅजिकचाच म्हणजेच जादूटोण्याचा प्रकार आहे हे तुमच्या लक्षात येईल. मात्र अशाप्रकारे राजरोसपणे सुरू असताना  पोलिसांचे याकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित केला जातोय. या सगळ्यावर या रिदम पांचाळशी  आम्ही त्याच्याशी संपर्क साधून त्याचं म्हणणं जाणून घेतलं तर त्यांनी हे सगळे आरोप फेटाळले. अशाप्रकारे कुठलाही जादूटोणा मी करत नाही, तर मी एक प्रकारे पूजा करत लोकांची सेवा करतो आणि त्यातून एक रुपयाही कमवत नाही असं तो म्हणतो.. उलट त्यांचा त्रास मी दूर करतो असा दावा त्यांनी केला आहे.

सुशिक्षित लोक बळी – (भोंदूबाबा मुंबईत)

मुंबई जी कधीही झोपत नाही म्हणतात. जी कधीही शांत नसते. जिथे नेहमी वर्दळ असते. अशा दाट वस्ती असलेल्या मुंबईमध्ये अशाप्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी गोष्ट घडते. ही फक्त आताच घडतीये असं नाही तर मागील अनेक दिवसांपासून घडते. त्याला अनेक सुशिक्षित लोक बळी पडताय आणि याला खत पाणी देतात हे एक प्रकारे दुर्दैव आहे. त्यामुळे अशा वृत्तीला त्या ठिकाणीच थांबवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्यासारख्यांनी डोळे उघडे ठेवून हे प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न करणे सुद्धा तितकेच महत्वाचं आहे. यावर आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात? हे पहावं लागेल.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

आणखी वाचा

Comments are closed.