नगरसेवकपद धोक्यात, मग नॉट रिचेबल…सहर शेख वानखेडेवर, स्टोरी पोस्ट करत म्हणाल्या, गेम ओव्हर!
सहार शेख मुंब्रा AIMIM: बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात अडचणीत असलेली ठाणे महानगरपालिकेतील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख (Sahar Shaikh) ‘नॉट रिचेबल’ असताना वानखेडे स्टेडियमवर दिसल्या. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स (Mumbai Indians vs Punjab Kings) यांच्यात 16 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला. मुंबई आणि पंजाबचा हा सामना पाहण्यासाठी सहर शेख वानखेडे मैदानात उपस्थित होत्या. सहर शेख यांनी स्वत: इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.
कैसे हराया म्हणत विरोधकांना डिवचणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख आणि तिचे वडील युनूस शेख सध्या ‘बनावट जात प्रमाणपत्रा’मुळे कायदेशीर कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा झाली. पण मुंबई आणि पंजाब यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सहर शेख उपस्थित होत्या. मागील 24 तासांपासून सहर शेख ‘नॉट रिचेबल’ होती. पण सहर शेख आयपीएलच्या सामन्यावेळी दिसल्या. (Sahar Shaikh Mumbra AIMIM)
सहर शेख यांनी शेअर केलेल्या स्टोरीची चर्चा- (Sahar Shaikh Mumbra AIMIM)
सहर शेख यांनी इन्स्टाग्रामवर स्टेडियमच्या गॅलरीतील व्हिडीओ पोस्ट केला आहे. यासोबत व्हिडीओ पोस्ट करताना गेम ओव्हर…असंही सहर शेख यांनी लिहिलं आहे. तसेच तूने ना जाना तेरे जाने से क्या क्या हुआ, कितनी कहानी बनी कितना तमाशा हुआ..जाने तू कैसी होगी..असं गाणंही सहर शेख यांनी व्हिडीओसोबत पोस्ट केलंय. सहर शेख यांनी तेरे जाने से क्या क्या हुआ…या गाण्याने सहर शेख यांनी सगळ्यांना पुन्हा डिवचल्याचे बोलले जात आहे.
सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात, नेमकं कारण काय? (Sahar Shaikh Mumbra AIMIM)
ठाणे महापालिकेच्या एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून बोगस जात प्रमाणपत्र दाखला सादर करून निवडणूक लढवल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. सहर शेख यांनी बनावट कागदपत्राचे आधारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार करून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रारदाराची मागणी आहे. सहर शेखकडून यंत्रणांची दिशाभूल केल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. उत्तर प्रदेशातील गाजियाबादची मूळ रहिवासी युनूस इक्बाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवला. त्यांची मुलगी सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले आणि त्यानंतर ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी झाल्या. ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्दिकी अहमद यांनी सहर शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती. युनूस यांनी स्थलांतरितांना नमुना 10 लागू असताना नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळवला. त्या आधारे सहरने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी सिद्धीकी अहमद यांनी केली आहे.
कोण आहेत सहर शेख? (Who Is Sahar Shaikh?)
सहर शेख सध्या ठाणे महानगरपालिकेत एमआयएमच्या नगरसेविका आहेत. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत सहर शेख ठाण्यातील मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झाल्या होत्या. निवडणुकीवेळी सहर शेख आणि तिचे वडील युनूस शेख यांनी मुंब्रातील शरद पवार गटाचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना अंगावर घेत जोरदार टीका केली होती.
सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.