चौकशी सुरु असताना अशोक खरातच्या छातीत कळ आली अन् पोलिसांची धावाधाव, कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स माग

अशोक खरात गुन्हा बातमी दैवी अवता असल्याचे भासवून अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि आर्थिक फसवणूक करणारा भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. अशोक खरात याची गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्त्वाखालील एसआयटी पथकाकडून (SIT) कसून चौकशी सुरु आहे. एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या गुन्ह्यात त्याला पोलीस कोठडीत घेऊन एसआयटी दररोज अनेक तास खरात याची चौकशी करत आहे. मात्र, मंगळवारी एसआयटीकडून चौकशी सुरु असताना अशोक खरात याची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. (Nashik Crime news)

अशोक खरात याला चौकशी सुरु असताना अचानक डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. यानंतर त्याच्या छातीत दुखायला लागल्याने त्याला तात्काळ ऑक्सिजन लावण्यात आला. अशोक खरात याच्यासाठी तात्काळ कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अशोक खरातला नेमका काय आणि कशामुळे त्रास झाला, याची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अलीकडेच अशोक खरात याच्या वकिलांनी न्यायालयात एक महत्त्वाची मागणी केली होती. आरोपीच्या खांद्याचे ऑपरेशन झाले आहे, त्याचे डोकेही दुखत आहे. पेनकिलर गोळ्या, औषधांनी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे अशोक खरात याला वैद्यकीय तपासणीवेळी न्यूरोसर्जनकडे घेऊन जावे, अशी मागणी खरातच्या वकिलांनी केली होती. यानंतर तीन दिवसांतच अशोक खरात याची प्रकृती बिघडल्याने या सगळ्यात काही काळंबेरं तर नाही ना, अशी शंकाही उपस्थित झाली आहे. अद्याप पोलिसांनी अशोक खरात याच्या प्रकृतीबाबत नेमकी माहिती दिलेली नाही.

Nashik Crime news: अशोक खरात प्रकरणात नाशिकमधील बड्या हॉटेल व्यावसायिकाची  चौकशी

अशोक खरात याच्याशी संबंधित असलेले डॉक्टर्स आणि अन्य व्यक्तींची एसआयटीकडून चौकशी केली जात आहे. आता खरात प्रकरणात नाशिकमधील एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची चौकशी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. एसआयटीने तब्बल सहा तास या हॉटेल व्यावसायिकाची चौकशी केल्याचे समजते. त्याच्याकडून काही आर्थिक व्यवहारांबाबत माहिती घेण्यात आली. याशिवाय, अशोक खरात याच्याशी संबंध असलेले जमीन व्यवहार आणि इतर आर्थिक बाबींविषयी एसआयटीने या हॉटेल व्यावसायिकाला प्रश्न विचारले. सहा तासांच्या चौकशीनंतर मंगळवारी रात्री या हॉटेल व्यावसायिकाला उशीरा घरी सोडण्यात आले. अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपणार आहे. त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाईल. यावेळी एसआयटी कोणती नवी माहिती सादर करुन पुन्हा अशोक खरातची पोलीस कोठडी मिळवणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

अशोक खरात हा एकनाथ शिंदे अन् रुपाली चाकणकरांचा गुरु, राष्ट्रवादी-शिवसेनेला धडा शिकवण्यासाठीच पोलिसांना तपास करण्याच्या सूचना; श्याम मानव यांचा आरोप

आणखी वाचा

Comments are closed.