धक्कादायक! चुकीच्या दिशेने गाडी चालवल्याबद्दल जाब विचारला, कुर्ल्यात तरुणावर प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
मुंबई क्राईम न्यूज : चुकीच्या साईडने गाडी आणली याचा जाब विचारला म्हणून एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना कुर्ल्यात घडली आहे. मनीष सरोदे हा तरुण दुचाकीने कुर्ला एलबीएस मार्गावरून जात होता. या वेळी विष्णू गुप्ता नावाच्या आरोपीने समोरून उलट्या दिशेने दुचाकी आणली. उलट्या बाजूने का आला याचा जाब विचारलं असता या आरोपीने त्याच्याकडील चाकूने या तरुणाला तब्बल सहा वार केले. त्याच्या मानेत चाकू घुसवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकरणी व्हीबी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परप्रांतीयने मराठी तरुणावर हल्ला केलाय त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी
दरम्यान, जखमी अवस्थेतील मनीषला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी व्हीबी नगर पोलीस ठाणे पुढील तपास करत आहेत. विनाकारण एक परप्रांतीयने अशा प्रकारे मराठी तरुणावर हल्ला केलाय त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनीष च्या नातेवाईकांनी केली आहे.
संजय निरुपम यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बोरिवली एम.एच.बी पोलीस स्टेशन मध्ये मनसे कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल करून मनसे नेते नयन कदम,मनसेचे मुंबई उपनगराचे अध्यक्ष कुणाल माईनकर सोबत मोठ्या संख्या मध्ये कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दहिसर गणपत पाटील नगर परिसरात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरपम यांच्याकडून आज रिक्षा आणि टॅक्सी चालकांसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. 1 मे पासून रिक्षाने टॅक्सी चालकांना मराठी सक्ती केल्यामुळे ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी नाय येत असा मध्ये त्यांच्यात मोठा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हीच भीती दूर करण्यासाठी संजय निरुपम यांनी या मराठी सक्ती कायद्यामध्ये फेरविचार करावा असा काल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र पाठवले होते. संजय निरुपम मराठी सक्ती विरोधात बोलत असल्यामुळे मुंबई शहरात मनसे आक्रमक होऊन त्यांचा दहिसर गणपत पाटील नगर परिसरामध्ये संवाद कार्यक्रमांमध्ये गोंधळ घालून त्यांच्या गाडीवर हल्ला केला होता. या हल्ला प्रकरणी एम.एच.बी पोलिसांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.