बाळूमामाचा अवतार सांगून महिलेसोबत नको नको ते केलं, मनोहर मामाचे हादरवणारे कांड; अनेक मोठ्या नेत

मनोहर मामा भोसले बातम्या: भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याचे प्रकरण ताजे असताना स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणारा आणि भविष्य बदलवण्याचे आमिष दाखवत भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा (Manohar Mama Bhosale) याला सोलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पण मनोहर भोसले याला या आधी देखील आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कार सारखे 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आधीच्या 3 गुन्ह्यात जामीनावर असलेला मनोहर मामा पुन्हा एकदा आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांच्या कोठडीत आहे. (Manohar Mama Bhosale Crime News)

नेमकं प्रकरण काय? (Manohar Mama Bhosale Case)

एका तरुण रियल इस्टेट व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप मनोहर भोसलेवर आहे. 21 एप्रिल रोजी कुर्डुवाडी येथे एका हॉटेलमध्ये फिर्यादी बसलेला असताना एका अनोळखी व्यक्तीने तुम्ही आर्थिक अडचणीत आहात का? मनोहर भोसले यांच्याकडे काळ्या जादूची अघोरी विद्या आहे. त्या विद्येचा वापर करून तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढतील असे म्हणत विश्वास संपादन केलं. त्यानंतर मनोहर भोसले यांना विडिओ कॉल करून आर्थिक अडचणीची माहिती दिली. त्यानंतर भोसले याने आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगितले. तसेच पूजेसाठी दोन लाख रुपये खर्च असून 50 हजर रुपये तात्काळ भरण्यासाठी सांगितलं. करमाळा येथील निभोरे गावात मठात एका व्यक्तीला हे पैसे देण्यासाठी सांगितलं असता तक्रारदाराने विश्वास ठेवत 50 हजर रुपये संबंधित व्यक्तीला दिले. मात्र त्यानंतर संबंधित व्यक्तीने फोन बंद केला. तसेच मनोहर मामाने देखील पूजे संदर्भात कोणतंही संपर्क केला नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार भोसले विरोधात तक्रारदाराने दिली आहे. त्याच्या या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलिसांत जादूटोणा कायदा तसेच आर्थिक फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Manohar Mama Bhosale Crime News)

मनोहर भोसलेने पीडित महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले- (Manohar Mama Bhosale Case)

2021 साली एका महिलेने मनोहर भोसले याने अत्याचार केल्याची तक्रार दिली. सिरीयलमध्ये काम मिळवून देतो असे आमिष दाखवून मनोहर भोसले याने पीडित महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेचं तीची आर्थिक फसवणूक ही केली. या महिलेच्या तक्रारीवरून सोलापूरच्या करमाळा पोलिसांत भोसले विरोधात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणत त्याला अटक ही झाली होती. आणि काही महिने त्याने तुरुंगवास ही भोगला. मात्र त्यानंतर तो या प्रकरणात जामीनावर बाहेर आहे. 2021 मध्ये बारामती येथील रुग्णाचे कॅन्सर बरे करतो असे सांगून मनोहर भोसले याने फसवणूक केली होती. रुग्णाला विविध प्रकारचे औषध देऊन तसेच पूजा घालून बरे करतो असे सांगत जवळपास 2 लाख 51 हजर रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी देखील त्याच्यावर बारामती पोलिसांत महाराष्ट्र जादू टोणा प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय पुणे ग्रामीण येथील दौंड पोलिसात देखील मनोहर भोसले विरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंद आहे. माझी भक्ती करा तुमच्या मणक्याचे आजार बरे करतो असे सांगून त्याने भक्ताकडून 50 हजार रुपये घेतलं होते. मणक्याचे त्रास बरे न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने दौंड पोलिसांत मनोहर भोसले विरोधात गुन्हा नोंद केला. विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर सोलापुरातल्या उंदरगाव येथील आश्रम देखील बेकायदेशीर असल्याची माहिती समोर आली होती. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर उंदरगांव येथील हे आश्रम बंद पडले. त्यानंतर त्याने त्याचा कारभार पुण्याला हलवलं होता. पुण्यातूनचं तो आपला हा सगळा भोंदूगिरीचा कारभार चालवत होता. (Manohar Mama Bhosale Crime News)

कोण आहे मनोहर मामा? (Who Is Manohar Mama Bhosale)

  • इंदापूर तालुक्यातील लारसुणे गावातला मूळचा रहिवासी
  • डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता
  • एक दिवस तो अचानक गायब झाला आणि काही वर्षानंतर आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगितले
  • करमाळा तालुक्यातील उंदरगाव परिसरात त्याने स्वतःचा मठ थाटला होता
  • साक्षात बाळूमामा येत असल्याचे ऐकल्यानंतर अमावस्या पौर्णिमेला त्याच्याकडे भक्ताची मोठी गर्दी होऊ लागली
  • अनेक मोठ्या नेत्यासोबत देखील मनोहर मामा याचे फोटो आहेत.
  • अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मामाच्या सल्ल्यासाठी गर्दी करायचे अशी चर्चा आहे.
  • या आधी त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणात सोलापुरातील करमाळा पोलिसात गुन्हा दाखल आहे.
  • तसेच कर्करोग बरा करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीत तर मणक्याचे आजार बरे करतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा नोंद आहे.
  • 2021 मध्ये 3 गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील त्याने आपली भोंदूगिरी सुरूच ठेवली होती.

संबंधित बातमी:

स्वतःला बाळू मामाचा अवतार सांगायचा, अखेर भोंदूगिरी उघड, मनोहर मामा भोसलेला अटक; सोलापूरचे SP म्हणाले..

आणखी वाचा

Comments are closed.