पुण्यातील नामांकित ILS लॉ कॉलेजमध्ये रॅगिंगचा धक्कादायक प्रकार, पाच तरुणांकडून 36 वर्षीय विद्या

गुन्हे बातम्या ठेवा: शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे (Pune) शहरातील अत्यंत प्रतिष्ठित आयएलएस विधी महाविद्यालयात (ILS Law College) रॅगिंगचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका 35 वर्षीय विद्यार्थ्याला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे महाविद्यालयीन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Pune Crime News: नेमकी घटना काय?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी हा 35 वर्षांचा असून तो ‘एलएलबी’च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. तो महाविद्यालयाच्या आवारातील मुलांच्या वसतिगृहात वास्तव्यास आहे. त्याच वसतिगृहात राहणाऱ्या आणि त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या पाच 20 वर्षीय विद्यार्थ्यांनी त्याला गेल्या काही काळापासून लक्ष्य केले होते. या विद्यार्थ्यांनी फिर्यादीला वारंवार शिवीगाळ करणे, अपमानास्पद वागणूक देणे आणि प्रचंड मानसिक त्रास देणे अशा प्रकारे रॅगिंग केल्याचा आरोप आहे.

Pune Crime News: पोलिसांची कारवाई

संबंधित पीडित विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वी डेक्कन पोलीस ठाण्यात या छळाबाबत लेखी अर्ज दिला होता. पोलिसांनी या अर्जाची गांभीर्याने दखल घेत प्राथमिक चौकशी पूर्ण केली. चौकशीत तथ्यता आढळल्यानंतर पोलिसांनी आदित्य सिंह, सुमित गायकवाड, राजहंस देशमुख, स्वराज गायकवाड आणि उज्वल राज या पाच विद्यार्थ्यांवर महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime News: महाविद्यालयाच्या भूमिकेकडे लक्ष

पीडित विद्यार्थ्याने या प्रकाराबाबत महाविद्यालय प्रशासनाकडेही तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने यावर नेमकी काय कारवाई केली, याची माहिती आता पोलीस घेत आहेत. रॅगिंग विरोधात कडक कायदे असतानाही नामांकित विधी महाविद्यालयात असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता हे पाचही विद्यार्थी कायद्याच्या कचाट्यात सापडले असून, महाविद्यालय त्यांच्यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Nashik Crime News: ऑफिसमधील केबिननंतर आता अशोक खरातच्या फार्महाऊसमधील नको नको ते व्हिडीओ SIT च्या हाती; महिलांसोबत काय काय केलं, कूकने केला भांडाफोड!

Shivaji Kon Hota Book Controversy: संजय गायकवाडांच्या गुंडगिरीचा उलटा परिणाम; ‘शिवाजी कोण होता?’ 4 दिवसांत 10 हजार प्रतींची विक्री, पुस्तकाची छपाई पुन्हा सुरु

आणखी वाचा

Comments are closed.