‘गेमिंग ॲप’वरून ओळख, प्रेमाचा बनाव रचत विवाहित मुस्लिम तरुणाकडून हरियाणाच्या तरुणीचं अपहरण
अकोला क्राईम न्यूज : नाशिक अमरावतीनंतर आता अकोला ‘लव्ह जिहाद’च्या घटनेने हादरलाय. प्रेमाच्या नावाखाली विवाहित मुस्लिम तरुणाकडून हिंदू मुलीचं अपहरण करीत 5 दिवस घरात डांबून (Akola Crime News) ठेवल्याचा प्रकार समोर आलाय. अखेर खदान पोलिसांकडून तरुणीची (Akola Crime) सुटका करण्यात आलीय. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. तर दुसरीकडे विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पोलीस ठाण्यात जमले होते. यावेळी घटनेमागे ‘लव्ह जिहाद’चा आरोप करण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्याचा ‘जमीर जाहीरउद्दीन काझी’ हा मुस्लिम युवक WHO ते आधीच विवाहित असून त्याला एक मुलं आहे. तो ‘गेमिंग ॲप’वर ‘बादशाह’ या युजरनेम नावाने बनावट अकाउंट चालवतो. या माध्यमातून त्याच्या अनेक तरुणींशी ओळख आहे. त्यातील हरियाणा राज्यातील एका हिंदू तरुणीसोबत त्याने जवळीक साधली, प्रेमाच्या नावाखाली तिला अकोल्यात आणलं. पुढं गीता नगर भागात स्वतःच्या घरात 5 दिवस ठेवलं. दरम्यान, तिने घरी आईने रागावल्याचं जमीरला सांगितलं होतं. त्यानंतर तिचा ‘ब्रेन वॉश’ करून स्वतःजवळ यायला भाग पाडलं, असा आरोप यावेळी करण्यात आलाय. या प्रकरणात हरियाणा पोलिसात अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या तिचा भाऊ शोधार्थ अकोल्यात आला, आणि खदान पोलिसांशी संपर्क केला असता हे सर्व बिंग फुटलं. सध्या जमीर काझी हा पोलिसांच्या ताब्यात असून आज दुपारपर्यंत हरियाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
या संपूर्ण घटनेला लव्ह जिहादची किनार असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदने केला आहे, नेमकं पाच दिवसात तिच्यासोबत काय घडलं, याचा सखोल झाला पाहिजे, अशी मागणी हिंदू संघटनेने रेटून धरलीय.
Akola Crime News : नेमकं प्रकरण काय?
– नाशिक, अमरावतीनंतर आता अकोला जिल्हा हादरला.
– विवाहित असलेल्या 25 वर्षीय मुस्लिम युवकाकडून ‘गेमिंग ॲप’वर बादशाह नावाचं बनावट अकाउंट.
– सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख, अन प्रेमाचं आमिष.
-आई रागवली मला घरात राहायचं नाही, तरुणीच जमीर’समोर रडगाणं. बनावट अकाउंटद्वारे चॅटिंग करत प्रेमाच्या नावाखाली बोलावून घेतलं अकोल्यात. पत्नी माहेरी असल्याने ठेवलं होतं 5 दिवसांपासून स्वतःच्या घरात.
– अखेर तरुणीचा भाऊ शोधार्थ अकोल्यात पोहचला, आणि विश्व हिंदू परिषदेच्या हेल्पलाइनवर साधला संपर्क.
– हिंदू संघटना आणि पोलिसांच्या मदतीने जमीरच्या तावडीतून तरुणीची 5 दिवसानंतर सुटका.
विश्व हिंदू परिषदकडून मुख्य मागणी (Vishva Hindu Parishad)
– गेल्या 5 दिवसापासून घरात ठेवल्याचं जमीरच्या आईला सर्व माहिती. मात्र, का साधली चुप्पी?, हिंदू संघटनेचा सवाल.
– तरुणी सोबत पाच दिवसात काय घडलं?, हे सर्व होत असताना मुस्लिम युवकाचे कुटुंब शांत का?, जमीरला यासाठी कोणी फायनान्स करत होता का? याचा सखोल तपास झाला पाहिजे, विश्व हिंदू परिषदची मागणी.
आणखी वाचा
Comments are closed.