एक डाव एकनाथ शिंदेंशी ओझरती चर्चा, फोनवर सामंताशी बोलणं, शिवसेनेकडून विधानपरिषदेवर जाण्याबाबत ब

बच्चू कडू विधान परिषद निवडणूक 2026 वर: गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी आता बार्गेनिंग गेम सुरु केला आहे. बच्चू कडू यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शिवसेनेकडून विधानपरिषदेवर (विधान परिषद निवडणूक 2026) जाण्याच्या चर्चेविषयी भाष्य केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या पक्षाकडून विधानपरिषदेत आमदार म्हणून जाण्याची अप्रत्यक्ष तयारी दाखवली. पण त्याचवेळी आपल्या प्रहार जनशक्ती संघटनेची ताकद आणि विस्तार महाराष्ट्रभरात कसा आहे, निवडणुकीच्या नंबर गेममध्ये समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा कसा फायदा होऊ शकतो, अशी मांडणी करत बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एकप्रकारे शिवसेनेसोबतच्या वाटाघाटीत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. (Maharashtra Politics  news)

यावेळी बच्चू कडू यांनी आपली फक्त एकदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाल्याचे सांगितले. त्यावेळी आमची थोडीफार चर्चा झाली. त्यानंतर मी विधान परिषदेवर जाणार, अशी बातमी प्रसारमाध्यमांनी दाखवली. त्यानंतर आम्ही उदय सामंत यांच्याशी बोललो, पण त्यामध्ये काही ठोस स्पष्टता नव्हती. विधानपरिषदेवर जाण्याबाबत नेमकी चर्चा झाली नाही, असे उदय सामंत यांनी म्हटले. पण विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरायची वेळ आल्यास माझ्या बॅगेत सर्व कागदपत्रं तयार असल्याचे सांगत बच्चू कडू यांनी आपल्यासाठी सर्व पर्याय उपलब्ध असल्याचे संकेत देत चेंडू पुन्हा एकनाथ शिंदेंच्या कोर्टात ढकलला. एकूणच या पत्रकार परिषदेतील बच्चू कडू यांचा सूर बघता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रहार संघटना विलीन करुन विधानपरिषदेवर जाण्याविषयी सकारात्मक दिसत आहेत. मात्र, त्या मोबदल्यात आपल्या पदरात काय पडणार, याची चाचपणी सध्या बच्चू कडू यांच्याकडून सुरु असल्याचे दिसत आहे. आपण पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. मी बंडखोरी केली त्यामधूनच प्रहार जनशक्ती संघटना निर्माण झाली. बच्चू कडू एकमात्र कार्यकर्ता असेल की, जो शिवसेनेतून बाहेर पडल्यावर दुसऱ्या पक्षात न जाता 25 वर्षे एकटा लढत राहिला. दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेतला नाही. इतकी माझी भूमिका तटस्थ राहिली आहे. पण फक्त आमदारकीसाठी कोणासोबत जावं इतका बच्चू कडू नालायक नाही, असेही त्यांनी सांगितले.

Prahar Janshakti Sangathan: प्रहार जनशक्ती संघटना फक्त विदर्भापुरती मर्यादित नाही: बच्चू कडू

प्रहार जनशक्ती या संघटनेचे महाराष्ट्रभरात किमान एक लाख सदस्य आहेत. राज्यातील पाच ते सहा लाख दिव्यांग बांधव आमच्यासोबत जोडलेले आहेत. फक्त विदर्भ आणि अमरावतीपुरता प्रहार संघटना मर्यादित नाही. आम्ही मुंबईत असतो तर विषय वेगळा असता. मुंबईत लहान गोष्टीचाही वेगळा विषय होतो, आम्ही तिकडे मेलो तरी बातमी होत नाही. शेवटी सगळा मिडिया मुंबईत आहे. प्रहार शिक्षक संघटना, प्रहार कामगार संघटना, प्रहार दिव्यांग संघटना, असे प्रहारचे राज्यव्यापी अस्तित्व आहे. ही कार्यकर्त्याने निर्माण केलेली संघटना आहे, जातीपातीवर निर्माण झालेली संघटना नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

मी विधानसभा निवडणुकीत पडलो. मात्र, आमदार नसतानाही मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन केले, ते यशस्वी झाले. आमच्या पाठपुराव्यामुळे दिव्यांगांना अडीच हजारांपर्यंत मानधन वाढवले. ग्रामीण भागात घरकुलासाठी 50 हजार रुपयांचा वाढीव निधी उपलब्ध झाला. आमच्यामुळे 185 शासन आदेश काढण्यात आले. आमच्यामुळे अर्थसंकल्पातील 40 ते 45 हजार कोटींचा निधी शेतकरी आणि मजूरांकडे वळाला, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

आणखी वाचा

Bacchu Kadu On Vidhan Parishad Election 2026: फॉर्म माझ्या बॅगेत, विधानपरिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करु, पण…, बच्चू कडूंनी अटी शर्ती सांगितल्या

आणखी वाचा

Comments are closed.