BCCIचा रियान परागवर ‘हंटर’! वेपिंग प्रकरणात कडक कारवाई; नेमकी काय शिक्षा झाली?, व्हायरल व्हिडिओ
व्हेप प्रकरणी बीसीसीआय रियान परागला दंड : राजस्थान रॉयल्सनं काल पंजाब किंग्जचा विजयरथ राजस्थान रॉयल्सनं रोखला. मात्र, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग अडचणीत आला आहे. रियान पराग ड्रेसिंग रुममध्ये वॅपिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर बीसीसीआयनं रियान परागला नोटीस देत उत्तर देण्यास सांगितलं आहे. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मंगळवारी (28 एप्रिल) ला राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यावेळी रियान पराग ड्रेसिंग रुममध्ये वॅपिंग करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
भारतात ई-सिगारेटवर बंदी असल्यामुळे या प्रकरणावरून विविध चर्चा रंगल्या होत्या, अगदी त्याला जेल होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात होती. मात्र आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आयपीएल प्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. आयपीएलने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, रियान परागवर त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 1 उल्लंघनासाठी त्याला 1 डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. या निर्णयामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, या प्रकरणात रियानवर ना कोणतीही बंदी घालण्यात आली आहे, ना त्याला जेलसारखी कठोर शिक्षा झाली आहे.
आयपीएलच्या निवेदनात म्हटले आहे की, रियान परागने आचारसंहितेच्या कलम 2.21 चे उल्लंघन केले, जे “खेळाची प्रतिष्ठा मलिन करणाऱ्या वर्तनाशी” संबंधित आहे. ही घटना सामन्याच्या दुसऱ्या डावादरम्यान घडली, जेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये वेपिंग करताना दिसला. पुढे असेही नमूद करण्यात आले की, रियानने आपली चूक मान्य केली असून, मॅच रेफरी अमित शर्मा यांनी दिलेली शिक्षा त्याने स्वीकारली आहे.
दरम्यान, बीसीसीआयने असेही संकेत दिले आहेत की, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी संबंधित संघ, अधिकारी किंवा खेळाडूंवर आणखी कठोर कारवाई करण्याचे पर्यायही तपासले जात आहेत. हे प्रकरण पंजाब किंग्सविरुद्ध मुल्लांपुर येथे झालेल्या सामन्यानंतर समोर आले होते. रियान परागचा वेपिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यामुळे हा वाद अधिक चिघळला. आता बीसीसीआयच्या निर्णयानंतर या प्रकरणावर पडदा पडला आहे.
राजस्थाननं पंजाबचा विजयरथ रोखला
न्यू चंदीगढमध्ये मुल्लानपूरमध्ये झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पंजाब किंग्जनं 20 ओव्हरमध्ये 4 बाद 222 धावा केल्या होत्या. मार्कस स्टॉइनिस यानं 62 धावा केल्या होत्या. तर, प्रभसिमरन सिंग यानं 59 धावा केल्या होत्या. पंजाबच्या धावसंख्येचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल आणि डेनोव फरेरानं अर्धशतक केलं. वैभव सूर्यवंशीनं देखील 43 धावा केल्या.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.