मुरलीधर मोहोळ ‘एमओए’चे नवे अध्यक्ष

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची रविवारी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे (एमओए) नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संपुलात आज झालेल्या ‘एमओए’च्या कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या विशेष  सर्वसाधारण सभेत आज अजित पवार यांच्या रिक्त जागेवर मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

अजित पवार यांच्या निधनाने ‘एमओए’चे अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आजच्या ‘एमओए’च्या बैठकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. ‘एमओए’चे उपाध्यक्ष आणि माजी आमदार संदीप जोशी यांनी आजच्या ‘एमओए’च्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले होते. माजी खासदार मनोज कोटक यांनी ‘एमओए’च्या अध्यक्षपदासाठी वरिष्ठ उपाध्यक्ष असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची सूचना मांडली. त्यानंतर कार्यकारिणीने या सूचनेला एकमताने मंजुरी दिली.

सुनेत्रा पवार अपात्र

‘एमओए’च्या घटनेतील नियम क्रमांक 12 प्रमाणे कार्यकारिणी मंडळात निवडून आलेल्या सदस्यालाच ‘एमओए’चे अध्यक्षपद भूषविता येते. त्यामुळे सुनेत्रा पवार अध्यक्षपदासाठी अपात्र ठरल्या. त्यामुळे मोहोळ यांचा मार्ग मोकळा झाला.

Comments are closed.