‘त्या’ने कोंबडी, कुत्रा, शेळीवरही अत्याचार केल्याचे उघड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुतणी आणि ज्येष्ठ महिलेवर बलात्कार करणाऱ्यां भीमराव कांबळे या नराधमाने कोंबड्या, शेळ्या आणि कुत्र्यावरही अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

हा नराधम नसरापूर गावच्या शेजारील साळवडे गावचा रहिवाशी होता. या व्यक्तीने वृद्ध महिला व पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केला होता. त्याच्या विकृतीमुळे 20 वर्षांपूर्वी ग्रामपंचायतने ठराव करून त्याला गावातून हाकलून दिले होते. भीमराव कांबळे हा नराधम राक्षसी स्वभावाचा असल्याचे त्याच्या गावातील नागरिकांनी सांगितले. यापूर्वी त्याने साळवडे गावात कोंबडी, कुत्रे व शेळ्यांवर लैंगिक अत्याचार केले होते. तसेच गावातील महिलांकडे तो वाईट नजरेने बघत होता.

Comments are closed.