विकृतपणामुळं आरोपीला गावातून 20 वर्षापूर्वीच हाकललेलं, बेपत्ता झालेल्या चिमुरडीला शोधणाऱ्या घोळ
पुणे: पुणे जिल्ह्यातील भेरमधील नसरापूर मधील चिमुरडीवर अत्याचार (Pune Nasrapur Case) करून निर्घृणपणे संपवलं, या घटनेनंतर पुणे जिल्ह्यासह राज्यात संतापाची लाट पसरली आहे. तर या ६५ वर्षीय आरोपीने आधी देखील दोन गुन्हे केले होते, ते देखील छेडछाडीचे आणि महिलांसंबंधी होते अशी माहती समोर आली आहे, तर नराधम आरोपीला (Pune Nasrapur Case) त्याच्या या विकृतपणामुळे त्याच्या मूळ गावामधून २० वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी मिळून ठराव करून गावबंदी केलेली होती अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील विकृत आरोपी हा मूळचा भोर तालुक्यातील साळवडे या गावातील रहिवासी होता. त्या गावामधून हाकलल्यानंतर तो नसरापूर येथे राहत होता.आजूबाजूला गावामध्ये छोटी मोठी कामं करून तिथं तो राहत होता. तर ज्यावेळी चिमुरडी बेपत्ता झाल्याचं समोर आलं, तेव्हा गावातील लोक जेव्हा तीला शोधत होते, त्यामध्ये देखील तो नरामध होता अशी माहिती समोर आली आहे. (Pune Nasrapur Case)
१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नसरापूर येथे घडलेल्या या अमानुष घटनेमुळे सगळेच हादरले. आरोपी पूर्वीपासूनच विकृत प्रवृत्तीचा असल्याचे वास्तवही समोर आले पोलिसांनी देखील त्याच्याबाबत माहिती सांगताना त्यावरती दोन गुन्हे होते, त्यातून तो सुटून बाहेर आला होता अशी माहिती आहे. आरोपी त्याच्या आधीच्या गावात देखील महिलांशी आक्षेपार्ह वागत होता. त्याने आधीही महिला आणि मुलीशी असभ्य वर्तणूक केली होती. त्याच्यावर अशाप्रकारचे दोन गुन्हेही दाखल झाले होते. त्यामुळे साळवडे गावकऱ्यांनी त्याला गावाबाहेर हाकलण्याचा कठोर निर्णय घेतला होता. (Pune Nasrapur Case)
Pune Nasrapur Case : चिमुरडीला शोधणाऱ्यांमध्ये आरोपीही होता
चिमुकली मुलगी खेळता खेळता बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आजीने शोध सुरू केला आणि गावकरी देखील मदतीला आले. तिला शोधत असाताना गावकऱ्यांसोहत आरोपी देखील तिला शोधत होता. काही ग्रामस्थांनी आरोपीकडे विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थांना संशय आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत कठोर चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. यासंबंधीचे वृत्त एका मराठी वृत्तसंस्थेने दिले आहे.
Pune Nasrapur Case : त्या बॅटरीवरील ‘सीसीटीव्ही’नं सगळं समोर आलं
घटनेदिवशी पीडित मुलगी मंदिराजवळ खेळत असल्याचे शेवटचे काहीनी पाहिले होते, त्यावेळी आरोपी विटा नेण्याचं काम करत होता. त्याने मुलीला आमिष दाखवून गोठ्यामध्ये नेलं. त्यावेळी गावातील लाईट गेलेली होती. त्यामुळे बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद झाले होते. मात्र, मंदिरासमोरील एका घरातील सीसीटीव्ही बॅटरीवर सुरू होता. त्या एका कँमेऱ्यात आरोपी कैद झाला आणि घटनेचा उलगडा झाला.
आणखी वाचा
Comments are closed.