Yusuf Pathan Crime: मोठी बातमी: युसूफ पठाणच्या सासऱ्यांना मारहाणप्रकरणात जामीन मंजूर
युसूफ पठाण गुन्हा: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचा (TMC) खासदार युसुफ पठाण यांच्या सासऱ्यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणी प्रकरणी युसूफ पठाण (Yusuf Pathan) यांचे सासरे खालीद खान आणि मेहुण्याला भायखळा पोलिसांनी अटक केली होती. सुरुवातीला झालेल्या वादात खालिद खान (Khalid Khan) हजर नव्हते. तसेच या घटनेत जखमी झालेल्या तक्रारदाराला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून खालिद खान यांच्याकडून काही जप्त करणे बाकी नसल्याचे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर करताना म्हटले. (Mumbai Crime news)
18 एप्रिलला भायखळा परिसरात रस्त्यावर साचलेल पाणी अंगावर उडाल्याच्या रागात कार चालक आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली होती. यावेळी मारहाणीची तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात जाणाऱ्या तक्रारदाराला खालिद खान आणि इतरांनी मारल्याचा आरोप आहे. मारहाणीत तक्रारदार युसूफ खान याचा मेहुणा सलमान याचा हात फ्रॅक्चर झाला होता. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी दोन्ही बाजूंविरोधात क्रॉस एफआयआर दाखल केला होता.
नेमकं प्रकरण काय? (Yusuf Pathan Farher In Law Case)
सदर प्रकरणातील तक्रारदाराच्या कारने रस्त्यावर साचलेलं पाणी अंगावर उडाल्याने वाद झाला आणि त्याची परिणीती मारहाणीत झाली. कारमुळे अंगावर पाणी उडाल्याने युसूफ खान नावाच्या व्यक्तीला युसूफ पठाणचा मेहूणा शोएब खानकडून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करायला जात असलेल्या युसुफ खानला युसुफ पठाणचे सासरे खालिद खान आणि त्यांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याचा आरोप युसुफ खानने केला आहे. यावेळी बांबू आणि बेसबॉल बॅटने मारहाण केल्याचा आरोप आहे. यात त्याचा हात देखील फ्रॅक्चर झाला आहे. भायखळा परिसरात शनिवारी रात्री घटना घडली होती. युसूफ पठाण यांच्या सासऱ्यांसह मेहुणा अशा एकूण तिघांना 2 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Yusuf Pathan Farher In Law Case)
Mumbai Police News: पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफ पठाणचा सासरा खालिद खान आणि त्यांचे मुलं उमरशाद आणि शोएब, तसेच आणखी एक आरोपी शाहबाज पठाण यांनी युसूफ खानशी वाद घातला. तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपींनी बेसबॉल बॅट्स आणि बांबूच्या काठ्यांचा वापर करून युसूफ खानला मारहाण केली. पोलिसांनी सांगितले की, शाहबाज खान सध्या फरार आहे, तर उर्वरित तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असून, न्यायालयाने त्यांना 2 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली असून, या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.