शाळेतील मार्कशीटवर खाडाखोड पाहताच बापाचं टाळकं सटकलं, चिमुरड्या लेकीला जीव जाईस्तोवर मारलं, पुण
दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्मदात्या वडिलांनी आपली पोटच्या लेकीला अमानुषपणे संपवल्याची घटना समोर आली आहे, भावाच्या मार्कलिस्टवरती खाडाखोड केल्याच्या (Pune Crime News) रागातून नराधम बापाने लाकूड (Pune Crime News) कापण्याच्या यंत्राने केलेल्या अमानुष मारहाणीत नऊ वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. आपण केलेल्या या कृर कृत्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीचा मृतदेह साडीमध्ये (Pune Crime News) गुंडाळून नंतर घराला आग लावली. ही घटना दौंड तालुक्यातील देऊळगावराजे हद्दीत हनुमानवस्ती येथे रविवारी ( ता ३ मे) दुपारी घडली आहे. तर चिमुकलीच्या मृत्यूने (Pune Crime News) हळहळ व्यक्त होत आहे, तर बापाच्या अशा कृर कृत्यावर संताप व्यक्त केला जात आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी आरोपी बाप शांताराम चव्हाण (वय ३३) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला (Pune Crime News) अटक केली आहे. मृत मुलीचे नाव अनामिका आहे. गुन्हा लपविण्यास मदत केल्याप्रकरणी चिंगू भोसले (रा. देऊळगावराजे) हिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)
घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संतापाच्या भरात आरोपीने मुलीला मारहाण (Pune Crime News) केली. घरातील लाकूड कापण्याच्या यंत्राचा वापर करून तिला मारहाण केली, यामध्ये ती गंभीर जखमी झाली. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मुलीचा मृतदेह साडीमध्ये (Pune Crime News) गुंडाळून घराला आग लावली. घटनेच्या वेळी मुलगी मदतीसाठी आक्रोश करत होती. मात्र, तिला वाचविण्यास कोणीही पुढे आले नाही. मृत मुलीचा भाऊ संस्कार (१०) याने घडलेला प्रकार नातेवाइकांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.(Pune Crime News)
Pune Crime News: पुरावे नष्ट करण्याच्या हेतून घर जाळलं…
पोटच्या लेकीला संपवल्यानंतर या नराधमाने क्रूरतेची सर्व सीमा पार केली. हा खून नसून अपघात आहे असे भासवण्यासाठी त्याने मुलीचा मृतदेह साडीत गुंडाळून घरात ठेवला आणि घराला आग लावून दिली. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या चिंगु भोसले हिनेही ही गंभीर बाब पोलिसांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.