सोलापूर जिल्ह्यात दुसरा भोंदूबाबाही गजाआड, भोंदू गुरुमाऊली वीरकरला पाच दिवसाची पोलीस कोठडी
सोलापूर मळा क्राईम न्यूज : व्यवसायात भरभराट करून देतो अशा पद्धतीची खोटी बतावणी करत वेगवेगळे जादूटोणे प्रयोग करणाऱ्या माढा तालुक्यातील आढेगाव येथील गुरुमाऊली वीरकर आणि त्याच्या साथीदाराला माढा न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या भोंदू बाबा विरोधात पंढरपूर तालुक्यातील एका पीडित तरुणाने फसवणुकीचा गुन्हा टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दाखल केला होता. त्यानुसार त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
पोलिसांनी अतिशय गोपनीयता बाळगत या भोंदू बाबाच्या विरोधात कारवाई
जादूटोणा आणि फसवणूक प्रकरणी तक्रार आल्यानंतर पूर्ण पोलिसांनी माढ्याच्या आढेगाव मधील भोंदु नाना विरकर उर्फ गुरु माऊली या महाराजाला व त्याचा भाऊ विकास विरकर या दोघांना भल्या पहाटेच अटक करुन गुन्हा दाखल केला होता. पंढरपूर मधील दोघा भक्तांनी जादुटोणा, अंधश्रध्दा व गुंतवणुकीच्या आमिषातून नाना विरकर याने लाखोंची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी अतिशय गोपनीयता बाळगत या भोंदू बाबाच्या विरोधात कारवाई केली होती.
भोंदू नाना विरकर याचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो
हा भोंदू नाना विरकर याचे खासदार सुप्रिया सुळे खासदार निलेश लंके यांचे सह अनेक राजकीय नेते व सेलिब्रिटी यांच्यासोबत चे फोटो सोशल मीडियात व्हायरल झालेले आहेच. आता सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अशा भोंदूगिरी करणाऱ्या भोंदू बाबांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही अतुल कुलकर्णी यांनी केल आहे. आता चार दिवसाच्या पोलीस कोठडीत या भोंदू वीरकर महाराजांचे अनेक प्रताप समोरी येण्याची शक्यता आहे.
न्यायालयाने दिले भोंदू बाबाला 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश
आज अटक करुन माढा न्यायालयासमोर दोघांना हजर केले होते. यावेळी न्यायालयाने या भोंदू बाबाला 4 दिवस (सोमवार) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठोठावले आहेत. यशवंत जाधव व निलेश भुईटे या पंढरपुर मधील दोघा भक्तांनी जादुटोणा ,अंधश्रध्दा व गुंतवणुकीच्या आमिषातून नाना विरकर याने लाखोंची फसवणूक केल्या प्रकरणी भक्तांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यानुसार नाना विरकर उर्फ गुरु माऊली आणी त्याचा भाऊ विकास विरकर च्या हातात बेड्या पडल्या असून जेलची हवा खाणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
Solapur Crime : मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
आणखी वाचा
Comments are closed.