शेवटच्या 1 चेंडू… 2 धावा… अन् मुंबईचं स्वप्न चक्काचूर! RCBने अखेरच्या बॉलवर फिरवला संपूर्ण
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स : आयपीएल 2026 च्या 54व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून अखेरच्या चेंडूवर 2 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पराभवासह मुंबईच्या प्लेऑफच्या आशाही जवळपास संपुष्टात आल्या आहेत. शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या थरारक सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 166 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची अवस्था एका क्षणी बिकट झाली होती, पण शेवटच्या षटकात सामन्याने जबरदस्त कलाटणी घेतली.
एक चित्तथरारक फिनिश जो युगानुयुगे लक्षात राहील 🤩
मध्यभागी अविश्वसनीय दृश्य 🥹
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/wYlCB10dhm#TATAIPL | #खेलबिंदास | #RCBvMI | @RCBTweets pic.twitter.com/VqXzwhUOnH
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 10 मे 2026
शेवटच्या षटकात आरसीबीचा विजय
विजयासाठी अखेरच्या 6 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज असताना राज बावाने 5 अतिरिक्त धावा दिल्या आणि सामना पूर्णपणे फिरला. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची आवश्यकता असताना रसिक सलामने शांतपणे दोन धावा पूर्ण करत आरसीबीला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. या रोमांचक विजयासह आरसीबीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर मुंबई इंडियन्ससाठी हा पराभव हंगाम संपवणारा ठरला. आरसीबीने कृणाल पांड्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित षटकांत आठ गडी गमावून 167 धावा केल्या आणि सामना जिंकला. मुंबईकडून कॉर्बिन बॉशने चार आणि दीपक चहरने दोन बळी घेतले, तर गझनफर आणि राज बावा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
भुवीचा रायपूरमध्ये कहर! एका ओव्हरमध्ये रोहित, सूर्या आणि रिकेल्टन OUT
मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी केली. रोहितने आक्रमक सुरुवात केली होती, मात्र डावाच्या तिसऱ्याच षटकात भुवनेश्वर कुमारने मुंबईला सलग मोठे धक्के देत सामना फिरवला. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर भुवीने रायन रिकेल्टनला 2 धावांवर बाद केले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर रोहित शर्माला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रोहितने 10 चेंडूत 22 धावा केल्या. त्यानंतर षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवलाही शून्यावर बाद करत भुवीने मुंबईची अवस्था बिकट केली.
तिलक वर्माने संघाची धुरा घेतली हाती अन्….
यानंतर नमनधीर आणि तिलक वर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी 82 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मात्र ही जोडी रशिख सलामने फोडली. त्याने नमनधीरला बाद केले. नमनधीरने 32 चेंडूत 47 धावांची खेळी केली. त्यानंतर रोमारियो शेफर्डने विल जॅक्सला 10 धावांवर बाद केले. तिलक वर्माने मात्र एकहाती झुंज देत मुंबईसाठी अर्धशतक झळकावले. तिलक वर्माने 42 चेंडूत 57 धावा केल्या. त्याच्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. याशिवाय राज बावाने 16 धावा केल्या, मात्र त्याला जोश हेझलवूडने बाद केले. कॉर्बिन बॉश 5 धावा करून बाद झाला, तर दीपक चाहर 1 धावेवर नाबाद राहिला. अशाप्रकारे मुंबई इंडियन्सने 7 विकेट गमावत 166 धावांपर्यंत मजल मारली.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.