नाशिक टीसीएस प्रकरणात निदा खानचे Defined Role…; राष्ट्रीय महिला आयोगाचा हादरवणारा अहवाल

निदा खान नाशिक TCS प्रकरण: नाशिकमधील टीसीएस प्रकरणी (Nashik TCS Case) राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल समोर आला आहे. सदर प्रकरणात निदा खानचा (Nida Khan) देखील महत्वाचा सहभाग होता, असा ठपका राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने 50 पानी अहवाल सादर केला आहे. यामध्ये निदा खानने इतर आरोपींसह महिलांचा छळ केला. जाळ्यात अडकलेल्या मुलींना निदा खान धार्मिक शिकवण द्यायची, असं  राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कंपनीच्या पॉश समितीनेही नाशिक युनिटला भेट दिली नसल्याचं उघड झालं आहे. (Nida Khan Nashik TCS Case)

नाशिक टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात काय? (Nida Khan Nashik TCS Case)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाच्या 50 पानी अहवालामध्ये मुख्य तक्रारदार त्यासोबतच इतर तक्रार केलेल्या महिलांनी निदा खानने कशाप्रकारे या प्रकरणात इतर आरोपींसह छळ केला याबाबतचा जबाब दिला आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये मुख्य आरोपींसह निदा खानचा “defined role” विशेष महत्त्वाचा रोल त्यामध्ये होता. दानिश, तौफिक आणि रजा मेनन हे आरोपी धर्माच्या जाळ्यात मुलींना अडकवण्याचा प्रयत्न करायचे. त्यासोबतच पूर्ण टीसीएस नाशिक युनिटवर त्यांचे नियंत्रण आणि दबाव होता आणि त्यानंतर धर्माची शिकवण किंवा धर्मातील प्रथा त्या मुलींना शिकवण्याचं काम निदा खानकडून केलं जायचं, अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या टीम समोर तक्रारदार महिलांनी दिल्याची माहिती आहे. टीसीएस पॉश अंतर्गत समितीचे म्हणणे सुद्धा महिला आयोगाने या अहवालात घेतले आहे. पॉश इंटरनल कमिटी ही पुण्यात असल्याने मागील अनेक महिन्यांपासून त्यांनी नाशिक टीसीएस युनिटला भेट दिलं नसल्याचं त्यांनी या सगळ्या चौकशी मध्ये कबूल केला असल्याची सुद्धा माहिती आहे.

निदा खानच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर- (Nashik TCS Case Nida Khan)

नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिच्या चौकशीत पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान निदा खान पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच धार्मिक शिक्षण देत पीडितेला विशिष्ट धर्माची प्रार्थना आणि पोशाख स्वीकारण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे. तपासात पीडितेला धार्मिक विषयांशी संबंधित तब्बल 171 लिंक पाठवण्यात आल्याचेही उघड झाले आहे. धार्मिक व्हिडिओ आणि ऑनलाइन सामग्रीच्या माध्यमातून मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या लिंक नेमक्या कुठून पाठवण्यात आल्या याचा तपास सुरू आहे. तसेच पीडितेला विशिष्ट पद्धतीने प्रार्थना आणि वर्तन करण्यास भाग पाडल्याचेही तपासातून समोर आले आहे. दरम्यान, निदा खानला 24 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित बातमी:

Nashik TCS Case Nida Khan: मोठी बातमी: निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टात आज नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.