NEET पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन? पोलिसांच्या चौकशीला वेग; आतापर्यंत चार जणांचा जबाब नोंद
लातूर : NEET(UG) 2026 पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन समोर येण्याची शक्यता अधिक गडद होत आहे. एका विद्यार्थिनीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर लातूर पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या खासगी क्लासेसची सखोल चौकशी सुरू केली आहे. संपूर्ण तपास अत्यंत गुप्ततेत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात संबंधित क्लास चालकाच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. बुधवारी पहाटे दोन जणांची आणि त्यानंतर आणखी दोन जणांची चौकशी करण्यात आली असून आतापर्यंत एकूण चार जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. चौकशीदरम्यान मिळालेल्या प्रत्येक माहितीची पोलिसांकडून बारकाईने पडताळणी केली जात आहे.
NEET Complaint Filed : विद्यार्थिनीच्या पालकांची गंभीर तक्रार
12 मे रोजी एका विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीत लातूरमधील एका खासगी क्लासेसने परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना दिलेल्या मॉक टेस्टमधील तब्बल 42 प्रश्न NEET(UG)-2026 च्या प्रत्यक्ष परीक्षेत जशाच्या तसे आल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे.
NEET Paper Leak Police Investigation : पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समरजीत साळवे यांच्याकडे चौकशी सोपवली आहे. पुढील काही दिवसांत आणखी संबंधितांची चौकशी होण्याची शक्यता असून दोषी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
NEET Paper Leak Nashik Connection : नाशिकमधून पेपर सर्वप्रथम फुटल्याचा दावा
दरम्यान, NEET पेपरफुटीचे नाशिक कनेक्शनही समोर आले आहे. नाशिकमधील 30 वर्षीय शुभम खैरनार याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने कथितरित्या 15 लाख रुपयांना पेपर विकल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास Central Bureau of Investigation (CBI) करत असून पुढील चौकशीसाठी त्याला दिल्लीला नेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
NEET UG 2026 रद्द : 2.2 लाख विद्यार्थ्यांचे वार्षिक निकाल
NEET UG 2026 परीक्षा 3 मे रोजी घेण्यात आली होती. देशभरातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी, तर महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. पेपर 42 तास आधीच लीक झाल्याच्या आरोपांनंतर National Testing Agency (NTA) ने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
NEET Re Exam Update : पुन्हा नोंदणी किंवा अतिरिक्त शुल्काची गरज नाही
NTA ने स्पष्ट केलं आहे की विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आणि कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. यापूर्वी भरलेली परीक्षा फी वैध राहील. बहुतांश विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा त्याच केंद्रांवर घेतली जाण्याची शक्यता असून नवीन वेळापत्रक आणि प्रवेशपत्रे अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहेत.
ही बातमी वाचा:
शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा
आणखी वाचा
Comments are closed.