मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक

नाशिक : जिल्ह्यातील (nashik) महिला लैंगिक प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरात (अशोक खरात) प्रकरणात एसआयटी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्याने एसआयटीने महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची चौकशी केली होती, तब्बल 6 तास त्यांच्याकडून घटनेची माहिती घेत तपास केला होता. त्यानंतर आता भोंदू खरातच्या प्रकरणात सिन्नर पोलिसांनी (Police) शिवनिका संस्थानचे माजी सचिव आणि जगदंबा माता पतसंस्था संचालक नामकर्ण आवारेला अटक केली आहे.

सिन्नर पोलिसांनी नामकर्ण आवारेला अटक केली असून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही अटक झाल्याची माहिती आहे. सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेत खरातने उघडलेल्या 32 खात्यांना आवारे याची सहमती असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई वेगाने करण्यात आली. खरातच्या कबुलीनंतर सिन्नर पोलिसांनी नामकर्ण आवारेला अटक केली.

अशोक खरात ला कालच सिन्नर पोलिसांनी अटक करून आज कोर्टात हजर केले होते, अशोक खरातच्या चौकशीत नामकर्ण आवारेचे नाव पुढे आल्यानं त्यास अटक करण्यात आली. नामकर्ण आवारे सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचा चेअरमन आणि जगदंबा माता पतसंस्था कुंदेवाडीचा संस्थापक आहे. नामकर्ण आवारे याने ‘असा मी नामकर्ण’ या पुस्तकात अशोक खरातची स्तुती करणारे प्रकरण लिहिल्याने आवारे चर्चेत आला होता.

अशोक खरातला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी

अशोक खरातला आज सिन्नर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज अशोक खरातला सिन्नर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. जगदंबा पतसंस्थेतील फेक अकाउंट आणि आर्थिक व्यवहारप्रकरणी अशोक खरातवर गुन्हा दाखल आहे. जगदंबा पतसंस्थेत 32 बनावट खाते उघडल्याने पोलिसांनी अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. या प्रकरणात आर्थिक सोर्स कोणता याचा पोलिसांना तपास करायचा आहे, त्यामुळे आणखी पोलीस कोठडी वाढवून मागण्यात आली.

हेही वाचा

ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे

आणखी वाचा

Comments are closed.