रायपूरमध्ये पावसाचा कहर; सामना रद्द झाला तर कोण जाणार प्लेऑफमध्ये? RCB-KKRचं धक्कादायक समीकरण स
RCB vs KKR पावसाचा नियम IPL 2026 : आयपीएल 2026 मधील 57वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रायपूरमध्ये खेळवला जाणार होता. मात्र पावसामुळे टॉसला उशीर झाला आणि त्यामुळे या सामन्याच्या निकालाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. प्लेऑफच्या शर्यतीत दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अशातच जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर प्लेऑफचं समीकरण नेमकं कसं बदलणार? जाणून घ्या संपूर्ण गणित.
सर्वप्रथम पॉइंट्स टेबलकडे नजर टाकली तर आसरीबी सध्या 14 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर केकेआरचे 9 गुण असून संघ आठव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे कोलकात्याचा प्लेऑफचा मार्ग बंगळुरूपेक्षा अधिक कठीण दिसत आहे.
सामना रद्द झाला तर काय होणार?
जर पावसामुळे आरसीबीविरुद्ध केकेआर सामना रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. अशा परिस्थितीत 12 सामने पूर्ण झाल्यानंतर आरसीबीचे 15 गुण होतील. आयपीएल इतिहास पाहिला तर 15 गुणांसहही काही संघांनी प्लेऑफ गाठले आहेत. मात्र आरसीबीने उरलेल्या दोन सामन्यांपैकी एक जरी जिंकला, तरी त्यांचे 17 गुण होतील आणि त्यांचे प्लेऑफ तिकीट जवळपास निश्चित मानले जाईल.
दुसरीकडे केकेआरने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. आजचा सामना रद्द झाल्यास त्यांच्या खात्यात 10 गुण जमा होतील. त्यानंतर त्यांचे अजून तीन सामने बाकी राहतील. आयपीएलमध्ये साधारणपणे 16 गुण हे प्लेऑफसाठी सुरक्षित मानले जातात. त्यामुळे आज एक गुण मिळाल्यानंतरही केकेआरला त्या ‘मॅजिक फिगर’पर्यंत पोहोचण्याची संधी कायम राहणार आहे.
गुणतालिकेत RCB vs KKR कुठे आहे?
गुणतालिकेत बंगळूरूने 11 सामन्यांत 7 विजय आणि 4 पराभवासह 14 गुण मिळवत दुसरे स्थान पटकावले आहे. आजचा सामना जिंकला तर आरसीबीही गुजरातप्रमाणे 16 गुणांपर्यंत पोहोचेल आणि प्लेऑफचे तिकीट जवळपास निश्चित करेल. त्यांचा नेट रनरेटही दमदार असल्याने ते पुन्हा टेबल टॉपर बनू शकतात.
दुसरीकडे कोलकात्याची परिस्थिती तणावपूर्ण आहे. त्यांनी 10 पैकी फक्त 4 सामने जिंकले, 5 गमावले तर 1 सामना निष्फळ ठरला. सध्या त्यांच्या खात्यात 9 गुण असून ते आठव्या स्थानावर आहेत. कोलकात्याचे अजून 4 सामने बाकी आहेत आणि प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना उरलेले चारही सामने जिंकणे जवळपास अनिवार्य आहे. एक जरी पराभव झाला तरी त्यांचे समीकरण पूर्णपणे बिघडू शकते.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.