34 वर्षांचा वाघ परतला! तीन वर्षांच्या वनवासानंतर नेमारला ब्राझीलच्या वर्ल्ड कप संघात स्थान
सांबाच्या तालावर पुन्हा एकदा जग थिरकणार. कारण आगामी फिफा वर्ल्ड कपसाठी ब्राझीलचा बिगुल वाजला असून त्यात नेमार ज्युनियरचाही समावेश करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून दुखापतींच्या जाळय़ात अडकलेला, 2023 नंतर देशाची जर्सी न घातलेला ब्राझीलचा सर्वकालीन फुटबॉलपटू नेमार पुन्हा मैदानात उतरणार आहे. प्रशिक्षक कार्लो अँचेलोटीने 34 वर्षांच्या या जादूगारावर विश्वास दाखवत त्याला ब्राझीलच्या प्राथमिक 50 खेळाडूंच्या यादीत स्थान दिलेय.
पोर्तुगालमध्ये पोर्टोसोबत लीग जिंकून आलेला 40 वर्षांचा चियागो सिल्वासुद्धा यादीत आहे. अनुभवी शिलेदार आणि नव्या दमाच्या तरुणांचा हा संगम ‘हेक्सा’ म्हणजे सहाव्या वर्ल्ड कपसाठी सज्ज झालाय. ब्राझील ग्रुप ‘सी’ मधून मोरोक्को, हैती आणि स्कॉटलंडशी भिडेल.
जग कपसाठी ब्राझीलचा संपूर्ण प्राथमिक संघ
गोलरक्षक – ॲलिसन, एडरसन, बेंटो, उगो सोझा, जॉन, कार्लोस मिगुएल. बचावफळी – मार्किन्होस, चियागो सिल्वा, गॅब्रिएल मॅगाल्हेस, ब्रेमर, लिओ परेरा, इबानेझ, अलेक्झांड्रो, फॅब्रिसिओ ब्रुनो, बेराल्डो, व्हिटर रेस, मुरिलो, वेस्ली, डॅनिलो, पाओलो हेन्रिक, विटिन्हो, ॲलेक्स सँड्रो, डग्लस सँटोस, लुसियानो जुबा, कायो हेन्रिक, काओ हेन्रिक, काऑगेस्टो. केंद्र मागे – काझेमिरो, ब्रुनो गुइमारेस, फॅबिन्हो, आंद्रे सँटोस, डॅनिलो, लुकास पॅकेटा, गॅब्रिएल सारा, जोआओ गोम्स, आंद्रियास परेरा, जोएलिन्टन, झेर्सन, माटेस परेरा आक्रमक – व्हिनिसियस ज्युनियर, हाफिन्हा, माटेस कुन्हा, लुईझ हेन्रिक, गॅब्रिएल मार्टिनेली, जोआओ पेड्रो, नेमार, अँड्रिक, रायन, अँटोनी, इगोर चियागो, पेड्रो, हिसारलिसन, इगोर जेजास, कायो जॉर्ज. प्रशिक्षक – कार्लो अँसेलोटी
Comments are closed.