अख्खं मैदान चिडीचूप, सगळे अवाक्; मनीष पांडेचा झेल पाहून विराट कोहलीही जाऊन भेटला, VIDEO

विराट कोहली आणि मनीष पांडे RCB विरुद्ध KKR IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 6 विकेट्सने विजय मिळवला. शतक झळकवणाऱ्या आरसीबीच्या विराट कोहलीला (Virat Kohli) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

कोलकाताविरुद्धच्या या सामन्यात विजयात विराट कोहलीने 150 धावांची खेळी करत सर्वात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या शतकी खेळीसह, विराट टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे, आयपीएलच्या इतिहासात रायपूरच्या स्टेडियमवर धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठा यशस्वी विजय मिळवण्याचा विक्रम आरसीबीने रचला आहे. दरम्यान, आरसीबी आणि कोलकाताच्या सामन्यात मनीष पांडे (Manish Pandey Catch) घेतलेल्या झेलने सर्वांचं लक्ष वेधलं.

मनीष पांडेचा झेल, विराट कोहली लगेच जाऊन भेटला- (Virat Kohli And Manish Pandey RCB vs KKR)

आरसीबीचा या सामन्यात विजय झाला असला तरी केकेआरचा फिल्डर मनीष पांडे याने आयपीएलच्या इतिहासातला सर्वोत्तम झेल पकडला. केकेआरचा फास्ट बॉलर कार्तिक त्यागीने टीम डेव्हिडला ऑफ स्टम्पच्या बाहेर बॉल टाकला, ज्यावर टीम डेव्हिडने कट मारला पण पॉईंटवर उभ्या असलेल्या मनीष पांडेने झेप घेत भन्नाट झेल पकडला. मनीष पांडेचा हा झेल पाहून संपूर्ण स्टेडियममध्ये एकच सन्नाटा पसरला तर कार्तिक त्यागी याचाही या झेलवर विश्वास बसला नाही. स्वत: टीम डेव्हिडही हा झेल पाहून अवाक झाला. विशेष म्हणजे विरोधी टीमचा असूनही विराट कोहली मनीष पांडेच्या जवळ जाऊन त्याच्या या झेलचं कौतुक करतान दिसला.

सामना कसा राहिला? (RCB vs KKR IPL 2026)

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फिन ॲलन (18) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (19) लवकर बाद झाले. मात्र, यष्टीरक्षक फलंदाज अंगक्रिश रघुवंशीने 46 चेंडूत 71 धावांची शानदार खेळी करत डावाला आकार दिला. त्याला कॅमेरून ग्रीनने (32) चांगली साथ दिली. अखेरच्या षटकांमध्ये रिंकू सिंगने 29 चेंडूत 49 धावांची नाबाद फटकेबाजी केल्यामुळे केकेआरने 20 षटकांत 4 गडी गमावून 192 धावांचा डोंगर उभा केला.

193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात वादळी झाली. जेकब बेथेल 15 धावा करून बाद झाला, पण त्यानंतर विराट कोहलीने मैदानाची सूत्रे आपल्या हातात घेतली. कोहलीने 60 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 105 धावा ठोकल्या. त्याने देवदत्त पडिक्कलसोबत (39) दुसऱ्या गड्यासाठी 92 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. कर्णधार रजत पाटीदार (11) आणि टिम डेव्हिड (2) स्वस्तात बाद झाले, मात्र कोहलीने एका बाजूने किल्ला लढवत आरसीबीला 19.1 षटकांतच विजय मिळवून दिला. जितेश शर्मा 8 धावांवर नाबाद राहिला. केकेआरकडून कार्तिक त्यागीने भेदक मारा करत 32 धावांत 3 बळी घेतले, तर सुनील नारायणला 1 बळी मिळाला. मात्र, इतर गोलंदाजांना कोहलीच्या झंझावाताला रोखण्यात अपयश आले. वैभव अरोरा आणि अनुकुल रॉय महागडे ठरले, ज्याचा फटका केकेआरला बसला.

संबंधित बातमी:

RCB vs KKR IPL 2026 : रायपूरमधील आयपीएलच्या इतिहासातला सर्वात मोठा ‘रन चेज’ आता आरसीबीच्या नावे! विराट कोहलीच्या 10व्या शतकाने KKRचा केला खेळ खल्लास

आणखी वाचा

Comments are closed.