जबरदस्ती घरात घुसले; मंगळसूत्र हिसकावलं; आळंदीत महिलेवर सामूहिक अत्याचार; 7 एप्रिलची घटना, नेमक

पुणे : आळंदी परिसरात एका महिलेला घरात घुसून मारहाण करत सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर समोर आला आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात (Pune Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपींनी ७ एप्रिल रोजी तिच्या घरात घुसून गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतलं. त्यानंतर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच घर आमच्या नावावर कर, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला त्रास देऊ, अशी धमकीही दिल्याचं फिर्यादीत (Pune Crime News) नमूद करण्यात आलं आहे. चार ते पाच महिन्यांपूर्वी आरोपी पीडितेच्या घरी आले होते. त्यावेळीही जबरदस्तीने शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचबरोबर पीडितेच्या नातेवाईकांशी गैरवर्तन आणि सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे.(Pune Crime News)

या प्रकरणी अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, श्याम महाराज राठोड, राहुल चोरेडिया, कालिनाथ गुलाबराव घुले, युवराज खरमाटे आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलिसांनी गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे.

Pune Crime News :  नेमकं काय घडलं?

पिडीतेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, घरात घुसून आरोपींनी जबरदस्तीने महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केला आहे. ही घटना ७ एप्रिल २०२६ तसेच चार-पाच महिन्यांपूर्वी दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आळंदी येथे घडली आहे. पीडित महिलेने याप्रकरणी २४ एप्रिल २०२६ रोजी याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, श्याम महाराज राठोड, राहुल सुरेश चोरडीया, कानीफनाथ गुलाबराव घुले, युवराज खरमाटे यांच्यासह एका महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हे ७ एप्रिल रोजी पीडितेच्या घरात आले. त्यांनी पीडित महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र काढुन घेतले. त्यानंतर संशयितांनी पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केले. तसेच पीडितेला शिवीगाळ केली. ‘हे तुझे घर आमच्या नावावर कर नाहीतर, ते घर विकून आम्हाला पैसे दे, नाहीतर आम्ही तुला असाच त्रास देत राहु, अशी धमकीही दिली.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.