मनोज जरांगे पुन्हा सरकारविरोधात मैदानात उतरण्याच्या तयारीत, जेवणाची शिदोरी घेऊन अंतरवाली सराटीक

मनोज जरंगे पाटील मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवली सराटी येथे बैठक बोलावलीय. या बैठकीसाठी बीड (Beed) मधील मराठा समाज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून जेवणाची शिदोरी घेऊन सराटीच्या दिशेने निघाला आहे. आंदोलनानंतर मराठवाड्यासाठी जो जीआर काढला त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. सातारा गॅझेट लागू झालेला नाही. शिंदे समितीच्या नोंदी सापडून देखील प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाची सरकारकडून अडवणूक सुरू असल्याचा दावा यावेळी मराठा आंदोलकांकडूनाही करण्यात येत आहे. (मराठा आरक्षण)

दरम्यानयाच मुद्द्यावरून आज आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. मराठा समाजाने मुंबईत आंदोलन केलं, मात्र सरकारने तोंडाला पान पुसली. सरकार आश्वासन देतं, मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही. आता किती दिवस शांत राहायचं पुन्हा मुंबईला जाण्याची वेळ पडली तर मुंबईला जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

मनोज जरंगे पाटील : आंतरवारी सराटीतील बैठकीची तारीख, आंदोलन आज जाहीर करणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून आज (१६ मध्ये) अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांची बैठक होणार आहे. कुणबी नोंदी असलेल्याना तत्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात यावंतसेच व्हॅलेडीटी तात्काळ देऊन मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, शिंदे समितीने रेकॉर्ड शोधावेत, यासह इतर मागण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन उभारण्याचा निर्धार मनोज जरंगे यांनी केला आहे, आज सकाळी दहा वाजता मनोज jarange यांनी अंतरवाली सराटीमध्ये बैठक ठेवली असून या बैठकीमध्ये आंदोलनाची तारीख जाहीर होणार आहे. दरम्यान मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार का? का वेगळा आंदोलनाचा मार्ग निवडणार, हे बैठकीनंतर मनोज जरांगे स्पष्ट करतील.

Beed News : मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान गुन्हा दाखल; वारंवार होणारा कोर्ट कचेरीचा त्रास, तरुणाची आत्महत्या

बीडच्या वैतागवाडी गावातील अशोक महादेव डीसले या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अशोक वर गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यात वारंवार पोघेतलास ठाण्यासह न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यासह अशोक नैराश्यात होता. हाच होणारा त्रास असह्य न झाल्याने अशोकने गळफास घेत आपले जीवन संपविल्याची माहिती त्याच्या कुटुंबाने दिली. दरम्यानमराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी वैतागवाडी गावात पोहोचून डीसले कुटुंबाचे सांत्वन केले. नैराश्यातून कोणत्याही तरुणाने आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलू नका. माणूस राहिला नाही तर आरक्षणाचे करायचे काय? असे आवाहन जरांगे पाटलांनी केले.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.