बुमरासाठी बीसीसीआयचा मास्टर प्लॅन
बीसीसीआयने आपला कसोटी आणि वन डे संघ दोन दिवसांपूर्वी जाहीर केला. पण यामध्ये ‘हिंदुस्थानचा यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराचे यामध्ये नाव नाही. बुमरा शेवटचा एकदिवसीय सामना खेळून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे बुमरा आता कसोटी किंवा वन डे क्रिकेट खेळणार की नाही, असे प्रश्न समोर यायला लागले आहेत. पण बीसीसीआयने बुमरासाठी मास्टर प्लॅन आखला असल्याचे आता समोर आले आहे.
कधी खेळला अखेरचा जंगल दिवस चेहरा
जसप्रीत बुमरा हा शेवटचा वन डे सामना नोव्हेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक अंतिम सामन्यात खेळला होता, जो सामना हिंदुस्थानने सहा गडी राखून गमावला होता. बुमराने त्यानंतर टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे, हिंदुस्थानला दोन टी-20 विश्वचषक (2024 आणि 2026) जिंकून देण्यात बुमराने मोलाचा वाटा उचलला होता. पण त्यामध्ये बुमराला वन डे क्रिकेटमध्ये संधीच देण्यात आलेली नाही.
कधी होणार एकदिवसीय कमबॅक…
बुमरा आता आयपीएल खेळत आहे, त्यामुळे त्याला विश्रांती मिळावी यासाठी अफगाणिस्तानविरुद्धच्या वन डे आणि कसोटी मालिकेसाठी संघात स्थान दिलेले नाही. बुमरासाठी बीसीसीआयने आता 2027 चा विश्वचषक हे लक्ष्य ठेवले आहे. त्यापूर्वी होणाऱ्या इंग्लंड मालिकेमध्ये त्याचे पुनरागमन होऊ शकते, अशी माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली आहे. तोपर्यंत त्याला टी-20 क्रिकेटमध्येच खेळवले जाणार आहे. निवड समिती पुढील वर्षी होणाऱ्या 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहेत. या मोठय़ा स्पर्धेसाठी बुमराला पूर्णपणे तंदुरुस्त आणि ताजेतवाने ठेवण्याकरिता त्याच्या कामाच्या भाराचे काळजीपूर्वक व्यवस्थापन केले जात आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये तो पूर्ण ताकदीनिशी खेळेल.
कसोटी क्रिकेटसाठी मोठी विश्रांती…
कसोटी क्रिकेटमध्ये उतरण्यापूर्वी मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा पूर्णपणे ताजेतवाने होण्यासाठी बुमराला अंदाजे सहा आठवडय़ांची (42 दिवसांची) मोठी विश्रांती दिली जाईल. मुख्य निवड समिती आणि सपोर्ट स्टाफने हे स्पष्ट केले आहे की, जर बुमराला सर्वोच्च तंदुरुस्ती पुन्हा मिळवण्यासाठी ही विश्रांती वाढवण्याची गरज वाटली, तर त्याला अधिक विश्रांती देण्यास कोणताही संकोच केला जाणार नाही. जरी बुमराच्या एकदिवसीय सामन्यांची संख्या मर्यादित केली जात असली तरी तो कसोटी क्रिकेटमध्ये हिंदुस्थानसाठी सातत्याने उपलब्ध राहील. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या जगातील अव्वल संघांविरुद्धच्या हायप्रोफाईल कसोटी मालिकांमध्ये बुमरा हे एक प्रमुख अस्त्र असेल, असा निर्णय मंडळाने घेतला आहे.
Comments are closed.