कल्याण पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, 34 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच जणांना ठोकल्या बेड्या
कल्याण क्राईम न्यूज : कल्याणमधील पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. 34 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. कुख्यात ड्रग्ज माफिया अमजद युसूफ पठाण याच्यासह पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाला कुख्यात ड्रग्स तस्कर ‘पठाण गॅंग’ गजाआड करण्यात यश आं आहे. मुंबई गोरेगाव नेक्सो घटनेतील धागेदोर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तब्बल 34 कोटी रुपये किमतीचे 9 किलो ड्रग्ज जप्त
कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत कुख्यात ‘पठाण गॅंग’चा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 34 कोटी रुपये किमतीचे 9 किलो ड्रग्ज जप्त( हेरॉईन) जप्त करण्यात आले आहे. कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाण याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिकहून कल्याण मार्गे मुंबईत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी करुन ते कल्याण आणि मुंबई परिसरात पुरवले जात होते. पठाण गँगचा म्होरक्या अमजद पठाण यांच्या विरोधात याआधी देखील आंतरराज्यीय ड्रग्स तस्करी प्रकरणी तसेच हत्या सारखे गंभीर स्वरूपाचे 20 गुन्हे दाखल आहेत. अमजद पठाणसह त्याचे साथीदार कासिफ वसईकर ,सद्दाम शेख ,कृष्णा हळेमणी, गणेश अन जंगमार उर्फ अण्णा या ड्रग्स तस्करांना देखील पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत. हे रॅकेट आणखी मोठे असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. आज पर्यंतच्या इतिहासातील ठाणे जिल्ह्यातील ही मोठी कारवाई आहे .
कल्याण पश्चिमेकडील सांगळेवाडी परिसरात 1 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कल्याण अमली विरोधी पथकाची गस्त सुरू असताना दोन इसम संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या दोघांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या पथकाने त्यांना तत्काळ ताब्यात घेतले त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली .या बॅगेमध्ये सुमारे 9 किलो 236 ग्रॅम हेरोईन आढळून आला. तपासा दरम्यान कासिम वसईकर व कृष्णा हळेमणी अशी या दोघांची नावे असल्याचे समोर आले. मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. डीसीपी अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी अनिल गायकवाड ,जितेंद्र ठोके यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासा दरम्यान या टोळीचा मुख्य सूत्रधार अमजद पठाण असल्याची माहिती समोर आली. या दरम्यान पोलिसांनी सद्दाम शेख व गणेश जंगमार या दोघांनाही बेड्या ठोकल्या.
कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कर्तव्यदक्षतेमुळे पठाण गॅंगचा पर्दाफाश
दरम्यान, अमजद पठाण हा इगतपुरी येथे लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने इगतपुरी येथे सापळा रचत अमजद पठाणला बेड्या ठोकल्या. पठाण यांचा हा मुख्य सूत्रधार हा अमजद पठाण असून तो ड्रग्स कासिम आणि सद्दामला देत होता. हे दोघे कृष्णा आणि गणेश यांच्या माध्यमातून ड्रग्स वितरित करीत असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे .पठाण गॅंग नाशिकहून कल्याण मार्गे मुंबईत पुरवठा करत होती. कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कर्तव्यदक्षतेमुळे पठाण गॅंगचा पर्दाफाश झाला असून कोट्यवधींच्या ड्रग्ससह कुख्यात ड्रग्स तस्कर गजाआड झालेत. ठाणे जिल्ह्यातील ही आजपर्यंतची मोठी कारवाई असून या कारवाईमुळं ड्रग्स तस्करीचे कंबरडे मोडल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
आणखी वाचा
Comments are closed.