पुणे ग्रामीण आणि बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई, 3 कोटी 4 लाखांचा गांजा जप्त, आरोपींना अटक

गुन्हे बातम्या ठेवा: पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करी उघड केली आहे. आज केलेल्या कारवाईत 23 किलो गांजा जप्त केला आहे. तर आतापर्यंत फेब्रुवारीपासून या कारवाईत तब्बल 634 किलो गांजा, दोन चारचाकी वाहने आणि इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे 3 कोटी 3 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सापळा रचून काही आरोपींना ताब्यात घेतले

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश काटे, समाधान गायकवाड, प्रिन्सकुमार सिंग, राहुल गोरे, विकी कांबळे, संग्राम सिंग, जॉकी माझी अशी आरोपींची नावे आहेत. तपासादरम्यान समाधान धर्मराज गायकवाड आणि विकी ऊर्फ पप्पू कांबळे यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने छत्तीसगडमधून गांजा आणून बारामती परिसरात साठवून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून काही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आणखी साथीदारांची नावे समोर आली.

आरोपींनी छत्तीसगडमधून मोठ्या प्रमाणावर गांजा आणून पश्चिम महाराष्ट्रात विक्रीचे जाळे उभारले

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी छत्तीसगडमधून मोठ्या प्रमाणावर गांजा आणून पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यात विक्रीचे जाळे उभे केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. 20 मे रोजी ते पंढरपूर-फलटणमार्गे बारामतीकडे येत असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु, त्यातील एक मोटार तासगावच्या दिशेने गेली. पोलिस व त्यांच्यामध्ये अंतर पडल्याने सांगली एलसीबीच्या मदतीने त्या मोटारीवर कारवाईत कऱण्यात आली. त्यात 134 किलो ग्रॅम वजनाचा 33 लाख 55 हजारांचा गांजा आढळला. विकी ऊर्फ पप्पू विजय कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसऱ्या पथकाने बारामती-फलटण रस्त्यावर शहरानजीक गवारफाटा येते दुसरी मोटार ताब्यात घेतली. त्यात 23 किलो 11 लाख 55 हजार रुपयांचा गांजा आढळला. याप्रकरणी हुसेन लष्करे, आदित्य शिंदे , युवराज दुर्गे यांच्यावर कारवाई करण्यात आली. बारामतीतील विकी कांबळे हा इतर साथीदारांच्या मदतीने गांजा खरेदी करून आणत तो पश्चिम महाराष्ट्रशहरातील सोलापूरसांगली, सातारा या जिल्ह्यांतील अन्य विक्रेत्यांना विकत असल्याचे समोर आले.

कल्याणमधील पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई, 34 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

कल्याणमधील पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. 34 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. कुख्यात ड्रग्ज माफिया अमजद युसूफ पठाण याच्यासह पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाला कुख्यात ड्रग्स तस्कर ‘पठाण गॅंग’ गजाआड करण्यात यश आं आहे. मुंबई गोरेगाव नेक्सो घटनेतील धागेदोर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी, पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटी रुपयांचा गांजा जप्त

आणखी वाचा

Comments are closed.