सुनेत्रा पवार निवडणूक आयोगाला राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची नवी यादी पाठवणार, तीन नेत्यांचा पत्

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात सध्या प्रचंड उलथापालथ आणि वेगवान राजकीय हालचाली सुरु आहेत. कालच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या मुंबईतील देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवल्यामुळे ही बैठक वादळी ठरली होती. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गोटातून आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या कार्यकारिणीवरुन या सगळ्या नाराजीनाट्याला सुरुवात झाली, त्यासंदर्भात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Politics News)

सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला लवकरच दिली जाणार आहे. यापूर्वी राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या कार्यकारिणीत प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे या दोघांनाही पदावरुन दूर केल्याची बातमी पसरली होती. तसेच नवख्या लोकांना राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत स्थान दिल्याने तटकरे आणि पटेल नाराज झाल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यकारिणीची सुधारित नवी यादी निवडणूक आयोगाला पाठवली जाणार आहे.  नव्या कार्यकारिणीत नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांच्याऐवजी हसन मुश्रीफ यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सुबोध मोहिते आणि प्रजापती यांनाही कार्यकारणीतून वगळले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काय घडामोडी घडतात, याकडे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

NCP Politics: प्रफुल पटेलांची दांडी, पार्थ पवारांची EXIT, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत काय घडलं?

* प्रफुल पटेलांची बैठकीला दांडी
* सुनील तटकरेंच्या बोलण्याआधिच पार्थ पवारांची बैठकीतुन EXIT
* सुनील तटकरे छगन भुजबळ यांच्यात वाद
* 10 जून पक्षाचा स्थापना मेळावा कुठं घ्यायचा यावरून मतमतांतरं – मेळावा मुंबईत होणार का पुण्यात?
* सुनेत्रा पवारांची खंत-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत विषय काढून देखील अद्याप अर्थ खाते पुन्हा देण्यात आले नाही.

आणखी वाचा

Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनील तटकरेंनी मनात साचलेलं सगळं बाहेर काढलं, भुजबळ अडवायला गेल्यावर म्हणाले, मी बोलणारच, काय तो सोक्षमोक्ष….

NCP Politics: प्रफुल पटेलांची दांडी, पार्थ पवारांची EXIT, सुनील तटकरे-छगन भुजबळ वाद…; राष्ट्रवादीची वादळी बैठक; काय काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.