मनीषा हवालदारकडून प्रश्न घेतले अन् वहीत लिहिले; 20 हजार दिल्याची चर्चा, पुण्याच्या APMA अकॅडमीच
पुणे : देशाला हादरवून सोडणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. आत्तापर्यंत १३ जणांना सीबीआयने अटक केली आहे. आज सीबीआयने आणखी दोन आरोपींची अटक दाखवली आहे. यातला पहिला आरोपी डॉ. मनोज शिरूरे याला लातूर मधून अटक करण्यात आली. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेली ही डॉक्टरांची पहिलीच अटक आहे. यापूर्वी अटक केलेले एकतर प्राध्यापक, क्लास चालक किंवा पेपर सर्क्युलेट करणारे आहेत. या पहिल्याच डॉक्टरला अटक केली असल्याने आणखी डॉक्टरांची मोठी लिंक समोर येण्याची शक्यता आहे. दुसरा आरोपी तेजस हर्षदकुमार शाह याला पुण्यातून अटक करण्यात आली.(NEET Paper Leak)
NEET Paper Leak : आतापर्यंत एकूण 13 आरोपींना अटक
तेजस शाह हा पुण्यातील ‘डॉ. अभंग प्रभू मेडिकल ॲकॅडमी’ (APMA) या कोचिंग सेंटरमध्ये भौतिकशास्त्राचा (Physics) शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तेजस शाह याने NEET-UG 2026 परीक्षेचे फुटलेले भौतिकशास्त्राचे प्रश्न हे आधीच अटक करण्यात आलेली आरोपी मनीषा हवलदार हिच्याकडून मिळवले होते, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकारात आतापर्यंत एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. (NEET Paper Leak)
NEET Paper Leak : शहाने मनिषा हवालदारला 20 हजार रुपये दिले?
पुण्यातील APMA कोचिंग संस्थेतील भौतिकशास्त्र शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह यालाही अटक केली आहे. भौतिकशास्त्राचे लीक प्रश्न मिळवल्याचा आरोप केला आहे. देशभरातील 49 ठिकाणी CBI चे छापे मारले आहेत. तपासात अनेक कागदपत्रे, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून आतापर्यंत 13 आरोपी अटकेत आले आहेत. रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच लीक झाल्याचा तपासात दावा केला आहे. पेपरफुटीमागील संपूर्ण रॅकेट आणि कटकारस्थान उघड करण्यासाठी CBIचा तपास सुरू आहे. तर नीट पेपरफुटी प्रकरणी भौतिकशास्त्र विषयाच्या पेपर मधील प्रश्न मिळवण्यासाठी शहाने हवालदार यांना २० हजार रुपये दिल्याची माहिती आहे. मनिषा हवालदार यांनी त्यांच्याकडील प्रश्नमालिकेतील प्रश्न शहा यांना दिले होते. शहा यांनी ते सर्व प्रश्न त्याच्या वही मध्ये लिहून घेतले. घरी गेल्यावर शहा यांनी हवालदार यांना या प्रश्नांचे फोटो काढून पाठवले. काल रात्री ९ वाजता शाह यांना सीबीआयने पुण्यातील विशेष न्यायालयात त्याला हजर केलं.
NEET Paper Leak : मोटेगावकर क्लासेसमुळे कोचिंग क्लासेस व्यवसायाची बदनामी
तर नीट पेपर फुटीनंतर कोचिंग क्लासेसच्या व्यवसायाची होत असलेल्या बदनामी विरोधात महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनचे आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर मोटेगावकर क्लासेसमुळे कोचिंग क्लासेस व्यवसायाची बदनामी होतं असल्याच्या विरोधात राज्यातील कोचिंग क्लासेस संघटना एकवटल्या आहेत. एक-दोन कोचिंग क्लासेसमुळे संपूर्ण कोचिंग क्लासेस व्यवसायाची बदनामी होतं असल्याचं महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनच म्हणणं आहे. इंटिग्रेटेड क्लासेसमुळे पेपर फुटी प्रकरणासमोर येत असल्याचा दावा या कोचिंग क्लासेस शिक्षकांनी केला आहे.
कॉर्पोरेट क्लासेस आणि कॉलेज त्यासोबतच शाळांना संलग्न असलेल्या इंटिग्रेटेड कॉलेजचा कोचिंग क्लासेस संघटना विरोध करणारा असून हे इंटिग्रेटेड कॉलेज बंद करण्याची सरकारकडे मागणी केली आहे. जे शिक्षक एखाद्या कॉलेज आणि शाळांमध्ये शिकवतात त्यांना कोचिंग क्लासेस मध्ये शिकवण्यास परवानगी मिळू नये, असे या कोचिंग क्लासेस संघटनांचे म्हणणं आहे. अशा इंटिग्रेटेड आणि कॉर्पोरेट क्लासेस मुळे पेपर फुटीचा प्रकार वाढत असल्याचं कोचिंग क्लासेस मालकांचे म्हणणं असून त्यावर सरकारने कडक नियमांची अंमलबजावणी करावी असं मत कोचिंग क्लासेस संघटनांनी मांडला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून आझाद मैदानावर विविध राज्यातील कोचिंग क्लासेसचे प्रतिनिधी एकत्र येऊन आपल्या व्यवसायाची होणाऱ्या बदनामी विरोधात आवाज उठवणार असून राजकीय नेत्यांना निवेदन देखील देणार आहेत.
शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा
आणखी वाचा
Comments are closed.