कुठलाही फॉर्मुला ठरला नाही,  सर्व 17 जागा महायुती म्हणूनच लढणार, मंत्री उदय सामंतांची माहिती

उदय सामंत: विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला काय असणार याबाबतचे चित्र उद्या संध्याकाळी स्पष्ट होणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. अजून कुठलाही फॉर्मुला ठरला नाही. सर्व काही उद्या समजेल से ते म्हणाले. रायगडच्या जागेबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेणार आहेत. राज्यातील सर्व 17 जागा महायुती म्हणूनच लढणार असल्याची माहिती देखील सामंत यांनी यावेळी दिली.

कुठल्याही फॉर्मुलावर शिक्कामोर्तब झाले नाही

राज्यातील विधान परिषदेच्या सर्व सतरा जागा महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत. उद्या संध्याकाळपर्यंत महायुतीच्या फॉर्म्युलाचे चित्र स्पष्ट होणार आहे. दिल्लीत जरी बैठका असल्या तरीही महायुती म्हणून आम्ही एका संघपणे निवडणुका लढू असे वक्तव्य राज्याचे उद्योग मंत्री तपास शिवसेना नेते उदय सामंत यांनी केले. ते आज पंढरपूरमध्ये आले होते. त्यावेळी बोलत होते. पंढरपुरात शिवसेना पदाधिकारी बैठकीच्या निमित्ताने उदय सामंत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमाची संवाद साधला. तसेच 14 जागा भाजपकडे अशी कुठल्या सूत्रांनी माहिती दिली. हे मलाही कळावे. असे म्हणत कुठल्याही फॉर्मुलावर शिक्कामोर्तब झाले नसल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत विधान परिषदेचे चित्र स्पष्ट होईल असेही ते म्हणाले.

कोकणामध्ये शिवसेनेची मतं जास्त, त्यामुळे तेथील सर्व जागांची मागणी आम्ही केली

कोकणामध्ये शिवसेनेची मतं जास्त आहेत. त्यामुळे तेथील सर्व जागांची मागणी आम्ही केली आहे. मात्र, कुठली जागा घ्यायची आणि कुठली सोडायची याचे शिवसेनेमध्ये सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना असल्याचे सांगत रायगडच्या जागे बाबतचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदेच घेतील असेही यावेळी उदय सामंत यांनी सांगितले.

कोणत्या जागेवर कुणाचा दावा?

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झाला नसला तरी ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे तो ती लढवेल अशी माहिती आहे. त्यानुसार चंद्रपूर, सांगलीसातारा या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे. तर परभणी हिंगोलीमध्ये शिवसेनेची ताकद आहे. त्यानुसार जागावाटप होणार असल्याची माहिती आहे.

महायुतीच्या नेत्यांची दिल्ली वारी

2022 मध्ये भाजपसोबत एकत्र येत शिंदेंनी सरकार स्थापन केलं.. पुढे 2023 मध्ये अजित पवारांची राष्ट्रवादीही या सरकारमध्ये सामील झाली.  त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत या महायुतीला प्रचंड बहुमतही मिळालं. मात्र, निवडणूक कोणतीही असो या महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपासाठी होणारी रस्सीखेच आणि त्यानंतर होणारी दिल्लीवारी हे समीकरण पक्कं झालं.

आणखी वाचा

Comments are closed.