सुमितचा पुन्हा जागतिक विक्रम! 74.82 मीटर भालाफेक करत इतिहास रचला
हिंदुस्थानचा दुहेरी पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतिलने पुन्हा एकदा जगाला आपल्या भाल्याची ताकद दाखवून दिली. बंगळुरूमध्ये झालेल्या आठव्या इंडियन ओपन पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या एफ-64 भालाफेक प्रकारात सुमितने तब्बल 74.82 मीटर अंतरावर भाला फेकत स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढला.
पाचव्या प्रयत्नात त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी 2023 मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या 2022च्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुमितने 73.29 मीटर भालाफेक करत जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. आता त्याने आपल्या जुन्या विक्रमात तब्बल 1.53 मीटरची भर घालत नवा इतिहास रचला आहे. सुमितने आतापर्यंत तब्बल सात वेळा जागतिक विक्रम मोडला आहे.
Comments are closed.