टीम इंडियात मोठे फेरबदल, रियान परागला BCCIकडून बाहेरचा रस्ता, ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधार म्

भारत अ श्रीलंका दौरा: श्रीलंकेत 9 जूनपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय तिंरगा मालिकेसाठी भारतीय ‘अ’ संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने (BCCI) या मालिकेसाठी बऱ्याच काळापूर्वी संघाची घोषणा केली होती, ज्यामध्ये तिलक वर्माकडे कर्णधारपद तर रियान परागकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, आता रियान पराग दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे.

हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे रियान पराग बाहेर (Riyan Parag OUT India A squad)

मिळालेल्या माहितीनुसार, रियान परागला हॅमस्ट्रिंगची (Hamstring Injury) दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे तो 9 जूनपासून श्रीलंकेत होणाऱ्या या महत्त्वाच्या मालिकेला मुकणार आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

रुतुराज गायकवाडचा भारत अ संघात थेट उपकर्णधार म्हणून समावेश करण्यात आला आहे

रियान पराग संघाबाहेर गेल्यानंतर निवड समितीने महाराष्ट्राचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड याचा संघात समावेश केला आहे. ऋतुराज गायकवाडला केवळ संघात स्थानच मिळाले नाही, तर त्याच्या अनुभवाचा विचार करता बीसीसीआयने त्याला थेट उपकर्णधार बनवले आहे. आता या मालिकेत तिलक वर्मा (कर्णधार) आणि ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार) यांच्या खांद्यावर संघाचे नेतृत्व असेल.

एकदिवसीय तिरंगी मालिका वेळापत्रक (India Sri Lanka Afghanistan ODI Tri-Series Schedule)

9 जून : भारत अ विरुद्ध श्रीलंका अ
11 जून : भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ
13 जून : अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ
15 जून : भारत अ विरुद्ध श्रीलंका अ
17 जून : भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ
19 जून : अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ
21 जून: अंतिम सामना

वनडे तिरंगी मालिकेसाठी भारत अ संघ (India ‘A’ Squad for the ODI Tri-Series)

तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), आयुष बडोनी, निशांत सिंधू, अनुकुल रॉय, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), विपराज निगम, यश ठाकूर, युधवीर सिंग, अंशुल कंबोज, अर्शद खान.

हे ही वाचा –

IPL 2026: आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले

आणखी वाचा

Comments are closed.