व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून आवाहन

पालघर : ऑनलाईन फसवणुकीचे (froud) प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे सायबर विभागाकडून देखील सातत्याने ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी आवाहन केले जाते. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून व्हॉट्सॲप व इतर समाजमाध्यमांद्वारे लग्नाच्या पत्रिका पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, याच गोष्टीचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा मार्ग अवलंबल्याची माहिती वसईतून (पालघर) समोर आली आहे. लग्नाची पत्रिका असल्याचे भासवून नागरिकांच्या मोबाईलमध्ये घातक फाईल पाठवून बँक खात्यांमधील रक्कम लंपास करण्याचे प्रकार वाढत आहेत. वसई विरारमध्येही अनेक प्रतिष्ठीत राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या व्हॉटसॲप वरु लग्नपत्रिकाचे निमंत्रण पाठवले जात आहेत. पोलिसांनी (Police) नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, प्रतिष्ठीत राजकीय नेत आणि महानगरपालिकेच्या अधिका-यांचे मोबाईल हॅक करुन, त्यांच्याव्हॉट्सॲप मोबाईल क्रमांकावरून हिंदी भाषेत संदेश पाठवला जातो. या संदेशात, “आमच्या घरी 7 जून रोजी लग्न आहे. कृपया कुटुंबासह उपस्थित राहा. मी लग्नाची पत्रिका पाठवली आहे, ती कशी आहे ते पाहून सांगा,” असे नमूद केलेले असते. या संदेशा सोबत ‘Invitation Card.apk’ यांची फाईल जोडली असते.

पोलिसांच्या मते, ही फाईल कोणतीही पीडीएफ किंवा फोटो नसून ‘APK’ स्वरूपातील अॅप्लिकेशन फाईल असते. नागरिकांनी ती डाऊनलोड किंवा इन्स्टॉल केल्यास मोबाईलमध्ये मॅलवेअर प्रवेश करू शकते. त्यामुळे मोबाईलमधील बँकिंग माहिती, पासवर्ड, ओटीपी तसेच वैयक्तिक माहिती सायबर चोरांच्या हाती जाण्याचा धोका निर्माण होतो. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या .APK फाईल्स डाऊनलोड करू नयेत, तसेच लग्नाची पत्रिका, फोटो किंवा व्हिडिओच्या नावाखाली आलेल्या संशयास्पद फाईल्स उघडण्यापूर्वी त्यांची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गॅसच्या केवायसीचेही दिले जाते उदाहरण

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या इंधन पुरवठ्याच्या टंचाईसह, गॅस टंचाईचा फायदा घेत काही सायबर भांमटे गॅस कनेक्शनची केवायसी करायची आहे. या निमित्ताने फोन करुन फसवणूक करतात, त्यापासूनही सावध राहण्याचे आवाहन सायबर विभागाने केले आहे. काही राजकीय नेतेमंडळीच्या आणि प्रशाकिया अधिकाऱ्यांच्या मोबाईल वरुन त्याचा मोबाईल हॅक करुन हे मॅसेज त्यांच्या सर्व परिचीत व्यक्तींना पाठवले जात असल्याने त्या सर्वांनी चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा

अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

आणखी वाचा

Comments are closed.