खेळाडूंनी भरलेल्या गुजरात टायटन्सच्या टीम बसला आग; गिल, बटलरपासून सगळ्यांना काढलं बाहेर, फायनलन
गुजरात टायटन्स टीम बस आग बातम्या: आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यानंतर गुजरात टायटन्सच्या संघासोबत एक हादरवणारी घटना घडली. नरेंद्र मोदी स्टेडियमवरून हॉटेलकडे जात असताना संघाच्या बसला अचानक आग लागली. धक्कादायक बाब म्हणजे आग लागली तेव्हा सर्व खेळाडू बसमध्येच होते.
गुजरात टायटन्सच्या बसला आग लागली, पण नेमकं कारण काय? (Gujarat Titans Team Bus Fire)
मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने, आग वेगाने पसरत असतानाच सर्व खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला वेळेत बसमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या या घटनेची अधिक चौकशी सुरू आहे.
1 तास अडकून पडले सगळे खेळाडू (Gujarat Titans Team Bus Fire Update)
आयपीएल फायनलनंतर, गुजरात टायटन्सचे खेळाडू नरेंद्र मोदी स्टेडियमवरून त्यांच्या हॉटेलकडे टीम बसने प्रवास करत असताना त्यांच्या बसमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच खेळाडूंना तात्काळ सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. दिलासादायक बाब म्हणजे, या घटनेत कोणताही खेळाडू जखमी झाला नाही. मात्र, ती रात्र अत्यंत त्रासदायक ठरली. दुसऱ्या वाहनाची व्यवस्था होईपर्यंत खेळाडू सुमारे 1 तास अडकून पडले होते आणि त्यानंतर त्यांना हॉटेलमध्ये नेण्यात आले.
🚨 गुजरात टायटन्ससाठी प्रचंड भीती !🤯
– आज आयपीएल फायनलमध्ये आरसीबीकडून पराभूत झाल्यानंतर, गुजरात टायटन्स संघाची बस नरेंद्र मोदी स्टेडियमपासून गंतव्यस्थानाकडे जात असताना अचानक बसमध्ये शॉर्ट सर्किट झाला, ज्यामुळे आगीच्या ज्वाळांचा उदय झाला. तथापि, चांगली बातमी अशी आहे की… pic.twitter.com/g6ATXSrIkZ
— भारतीय स्पोर्ट्स नेटवर्क (@IS_Netwrk29) 31 मे 2026
अंतिम सामन्यात काय घडलं (RCB vs GT IPL 2026 News)
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने उत्कृष्ट गोलंदाजी करत गुजरात टायटन्सला 20 षटकांत 8 गडी गमावून 155 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात, विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने 18 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्य गाठले आणि सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. यासह, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आयपीएलच्या इतिहासात सलग दोन वर्षे विजेतेपद पटकावणारा तिसरा संघ ठरला. यापूर्वी केवळ चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सने ही कामगिरी केली होती.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.