ठाण्यातील वृद्ध मारहाण प्रकरण, 14 तासांनंतर परप्रांतीय मुजोर कॅब चालकावर गुन्हा दाखल
ठाणे : ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर रस्त्यावर थुंकल्याचा जाब विचारल्यामुळे वयोवृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण करणाऱ्या मुजोर परप्रांतीय कॅब चालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अखेर 14 तासांच्या प्रतीक्षेनंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या मुजोर कॅब चालकाचे नाव निशांत धर शुक्ला असं आहे. मारहाण झालेले वयोवृद्ध दाम्पत्य प्रचंड घाबरल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे स्वतःहून पोलिसांत तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते नितेश पाटोळे यांनी स्वतः या प्रकरणात फिर्यादी बनून पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुजोर चालकाचा शोध घेऊन त्याला चांगलाच चोप दिला आणि नंतर वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं. आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Thane Cab Driver Legal Action : ‘या’ कलमांन्वये गुन्हा दाखल
या प्रकरणाची भीषणता पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना थेट फोन करून कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार वर्तकनगर पोलिसांनी आरोपी निशांत शुक्ला याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) खालील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे:
BNS पेन 109 : हत्येचा प्रयत्न करणे (Attempt to Murder – जुने आयपीसी कलम 307).
bns पेन 352 : शांतता भंग करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर अपमान किंवा कृत्य करणे.
Thane Assault Case : नेमकं काय घडलं होतं?
ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाजवळून एक वयोवृद्ध दाम्पत्य पायी जात असताना कॅब चालक निशांत शुक्ला हा त्यांच्यासमोर रस्त्यावर थुंकला. त्यावर वृद्धाने त्याला ‘रस्त्यात थुंकू नकोस’ एवढाच समजुतीचा सल्ला दिला. मात्र, याचा राग मनात धरून या मुजोर चालकाने थेट हातात दगड घेऊन वयोवृद्धावर हल्ला चढवला. या जीवघेण्या मारहाणीत वयोवृद्ध गृहस्थ रस्त्यावर कोसळले. या मुजोर चालकाच्या मारहाणीमध्ये त्या वृद्धाचा पाय फ्रॅक्चर झाला.
मारहाणीच्या या घटनेचा व्हिडीओ समोर येताच दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने हालचाल करत संबंधित परप्रांतीय चालकाला शोधून काढलं आणि त्याला चांगलाच चोप देऊन वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं.
ही बातमी वाचा:
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.