20 तारखेला सगळ्यांनी दिल्लीला जायचं अन् धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटायचं ना

Cockroach Janta Party :  देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी संतापाची लाट पसरली आहे. पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (Cockroach Janta Party) आक्रमक झाली आहे. नीट परीक्षेत झालेल्या गोधळांचा मुद्दा या कॉकरोच जनता पार्टीने उचलून धरला आहे. याच मुद्द्यावरून सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके (Abhijeet Dipke) यांच्या उपस्थितीत ६ जून रोजी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल. आज कॉकरोच जनता पार्टीकडून पुण्यातही आंदोलन केले जात आहे. दरम्यान, अभिजित दीपके यांनी आज पत्रकार परिषद बोलताना केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे आता केंद्र सरकारवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.(Cockroach Janta Party)

Abhijeet Dipke CJP: 20 तारखेला सगळ्यांनी दिल्लीला जायचं अन्…

अभिजित दीपके  (Abhijeet Dipke) यांनी आज (११ जून) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावळी त्यांनी येत्या 20 जून रोजी दिल्लीत आणखी मोठे आंदोलन केले जाईल, अशी माहिती दिली. आम्ही सध्या पुण्यात आंदोलन करत आहोत. आमच्यासोबत पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत, एमपीएससी, यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. तर 20 तारखेला सगळ्यांनी दिल्लीला जायचं अन् धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटायचं नाही असंही दीपके यांनी म्हटलं आहे.  (Abhijeet Dipke)

Abhijeet Dipke CJP: पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे…

अभिजित दीपके यांनी आजच्या पुण्यातील आंदोलनाबाबत माहिती देताना म्हटलं की, आज संध्याकाळी शांततापूर्ण आंदोलन होणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा घेण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. आम्ही शिक्षणाबद्दल आज जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहोत. सोनम वांगचुक देखील आंदोलनात सहभागी होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं, असं आवाहन देखील दीपकेंनी केलंय. तर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. माझ्यासाठी पुणे होम ग्राउंड आहे. या पुढे नागपूरमध्ये जाणार आहे. आम्ही सरकारची चर्चा तयार आहे, मात्र ते आमचे अकाउंट बंद करत आहे, ही कसली पद्धत आहे? आजचं आंदोलन हे जंतर मंतर पेक्षा मोठं होईल हा विश्वास आहे, आम्ही कुठल्या राजकीय पक्ष विरोधात नाहीतर विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करत आहोत, असंही दीपके यांनी स्पष्ट केलं आहे.

कॉकरोच जनता पार्टी हा एक मोठा मेसेज देशासाठी आहे. विद्यार्थीसाठी हे सर्व आहे, याला फेक म्हणू नका. शेतकऱ्यांच्या आंदोलनात ही सहभागी होऊ पण आधी हा प्रश्न ही आम्ही लावून धरला आहे. २० तारखेला सर्वांनी दिल्लीला जायचं आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय तिथून माघारी यायचं नाही, असंही दीपके यांनी यावेळी सांगितलं आहे.

शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा

हेदेखील वाचा

Comments are closed.