गृहकर्जाच्या ईएमआयमध्ये 2000 रुपये जास्त भरा, 1 कोटींच्या कर्जावर 6.85 लाख वाचवा, जाणून घ्या
गृहकर्ज मुंबई: नवी दिल्ली, मुंबईकोलकाता किंवा पुणे या सारख्या महानगरांमध्ये असो की छोट्या शहरांमध्ये घर खरेदी करायचं असल्यास बहुतांश लोकांना गृहकर्जाचा आधार घ्यावा लागतो. गृहकर्ज काढण्यासाठी मग सार्वजनिक बँका, खासगी बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडून गृहकर्ज घ्यावं लागतं. गृहकर्जाचा कालावधी दीर्घ असल्यानं जितकं कर्ज घेतलंय, जवळपास तेवढीच रक्कम गृहकर्जाच्या व्याजाच्या रुपात बँकांना मिळत असते. सर्वसाधारणपणे गृहकर्जाचा कालावधी 15 ते 25 वर्षांच्या दरम्यान असतो. दरमहा ईएमआयमध्ये 2000 रुपये अधिक भरुन 6 लाखांहून अधिक रक्कम कशी वाचवायची ते जाणून घेणार आहोत.
समजा एखाद्या कर्जदारानं 1 कोटी रुपयांचं कर्ज 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेतलं आणि त्याचा व्याज दर 8.25 टक्के असेल तर त्याला मासिक हप्ता 85207 हजार रुपये भरावा लागतो. एखाद्या कर्जदारानं पूर्ण कालावधी संपेपर्यंत कर्जाची परत फेड केल्यास त्याला 2.04 कोटी रुपये भरावे लागतात. म्हणजेच तो 1.04 कोटी रुपये व्याजापोटी भरतो. मात्र, ईएआयमध्ये थोडा बदल केल्यास मोठा बदल दिसून येऊ शकतो. मासिक ईएमआयमध्ये 2000 रुपये अधिक जमा केल्यास काय परिणाम होतो ते जाणून घेणार आहोत.
Home Loan EMI : गृहकर्जाचा ईएमआय वाढवल्यास किती फायदा?
1 कोटी रुपयांच्या गृहकर्जाचा 20 वर्षांचा विचार केल्यास 240 महिने 8.25 टक्के व्याज दरानं दरमहा हप्ता 85207 रुपये भरावा लागेल. यामध्ये 2000 रुपयांची वाढ केल्यास हप्त्याची रक्कम 87207 रुपये होईल. 85207 रुपयांच्या नियमित परतफेडीनुसार कर्जदाराला 2 कोटी 4 लाख 49 हजार 680 रुपये भरावे लागतील. दुसरीकडे ईएमआयमध्ये 2000 रुपये अधिक भरल्यास 87207 रुपये हप्ता भरणे सुरु ठेवल्यास 240 महिन्यांचं गृहकर्ज 227 महिन्यात संपेल. म्हणजेच 20 वर्षांचं कर्ज 18 वर्ष 11 महिन्यात संपेल. कर्जदार 227 महिन्यात 1 कोटी 97 लाख 64 हजार 951 रुपये व्याज आणि मुद्दल मिळून भरेल. या कालावधीत कर्जदार व्याज म्हणून जी रक्कम जमा करेल ती 97 लाख 64 हजार 951 रुपये होईल. यामुळं गृहकर्जदाराचे 6 लाख 84 हजार 729 रुपयांची बचत होईल.
तुम्ही गृहकर्ज घेतल्यानंतर ते प्रामुख्यानं दीर्घकाळासाठी असते. कर्ज परतफेडीच्या सुरुवातीच्या दिवसात ईएमआयमधील मोठी रक्कम व्याज म्हणून जाते. तर, मुद्दलात खूप कमी रक्कम जमा होते. 85207 रुपये ईएमआय असेल तर त्यापैकी 68750 रुपये व्याज म्हणून जातात. तर, मुद्दलात 16457 रुपये ते 18457 रुपये जातात. ईएमआयसोबत 2000 रुपये अधिक जमा केल्यास ते थेट मुद्दलाच्या रकमेत जमा होतात.
गृहकर्ज कमी व्याज दरावर घेण्यासोबतच त्याची स्मार्टपणे परतफेड करणं आवश्यक आहे. तुमच्या उत्पन्नानुसार ईएमआयची रक्कम थोडी री वाढवली तर तुम्ही भविष्यात मोठी रक्कम वाचवू शकता.
दरम्यान, गृहकर्जाची परतफेड करताना किंवा ईएमआयमध्ये अधिक रक्कम जमा करताना बँकेच्या नियमांची माहिती घेणं आवश्यक आहे. प्रीपेमेंटचे नियम, ईएमआयमधील बदल आणि इतर अटी जाणून घेणं आवश्यक आहे. मात्र, ईएमआयमध्ये थोडीशी वाढ केल्यास तुम्ही दीर्घकाळात मोठी बचत करु शकता.
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Comments are closed.