नरेंद्र दराडेंच्या बाजूला बसून माघारीची घोषणा, पण दराडेंना पाठिंबा देणार का? प्रश्न विचारताच गो
नाशिक विधान परिषद निवडणूक 2026: नाशिक विधान परिषद निवडणुकीतील भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी अखेर आपली माघार जाहीर केली खरी, मात्र ही माघार घेताना नाशिकमध्ये आज अभूतपूर्व आणि अत्यंत नाट्यमय प्रसंग पाहायला मिळाला. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या शेजारी बसून गोकुळ गीते यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. मात्र, “निवडणुकीतून थांबलात ठीक, पण नरेंद्र दराडे यांना तुमचा अधिकृत पाठिंबा आहे का?” असा थेट प्रश्न पत्रकारांनी विचारताच गोकुळ गिते यांनी कोणतेही उत्तर न देता ते ताडकन उठून तिथून निघून गेले. यामुळे महायुतीचा हा समेट केवळ नावापुरताच आहे का? अशी जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना गोकुळ गिते यांनी आपल्या मनातील खदखद आणि संताप जाहीरपणे बोलून दाखवला. गोकुळ गीते म्हणाले की, ही जागा भाजपच्या माध्यमातून गणेश गिते यांना दिली जावी, असा शब्द दिला होता. ही जागा शिंदे गटाला सुटल्याने वातावरण दूषित झाले. 1 जूनला अर्ज भरला, आम्हाला फोन आले, थांबले पाहिजे असे फोन आले. सर्व गोष्टी आपणास माहिती आहेत. महाजन यांचा कृपा आशीर्वाद आमच्या मागे आहे. भविष्यात अशी काही संधी आली तर आमचा विचार करतील, असा शब्द दिला आहे. मुंबईत चर्चा झाली, शिंदे साहेब यांच्याशी चर्चा झाली. ‘गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय’ आणि ‘बंडखोर’ अशा संज्ञा वापरल्या जातात म्हणून माघार घेत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शब्द दिला आहे, असे त्यांनी म्हटले.
Nashik Vidhan Parishad Election 2026: प्रश्न विचारताच गोकुळ गीते ताडकन उठून निघाले
माझ्या थांबण्याची चर्चा झाली, तरीही सोशल मीडियावर चर्चा झाली, मी घोडेबाजार केला नाही. मी माझा प्रचार थांबविला आहे, कार्यकर्त्यांना सांगितले प्रचार थांबविला आहे. मी कोणत्याही चौकशीला घाबरलो नाही, सर्वांचा आदर राखला जावा. लोकांच्या मागण्या मान्य करा, तुमच्या घरात दोन आमदारकी आहेत, लोकांचे प्रश्न सोडवा, असा सल्ला मी दराडे यांना दिला, असे देखील गोकुळ गीते म्हणाले. जेव्हा पत्रकारांनी त्यांना पाठिंब्याबाबत प्रश्न विचारला, तेव्हा त्यावर काहीही न बोलता ते थेट उठून निघून गेल्याचे पाहायला मिळाले.
Nashik Vidhan Parishad Election 2026: माझ्यामुळे गोकुळचा बळी गेला: गणेश गीते
गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते म्हणाले की, “गोकुळचा माझ्यामुळे बळी गेला आहे. राजकारणामुळे माझे कुटुंब फुटले. मी त्याला सांगितले आज माझे ऐक, यापुढे तुला तुझा मार्ग मोकळा आहे, तू निर्णय घेऊ शकतो. माझं प्रकरण न्यायालयात रद्द करण्यासाठी आहे, त्याचा निवडणुकीशी संबंध नाही. राजकारण आणि व्यवसाय हा दोन्ही विषय वेगळा आहे. आजपासून तू ज्या पक्षात जायचे ते तू ठरव. मी माझ्या नेत्यांना देखील सांगितले, आता गोकुळविषयी मला विचारू नका,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आणखी वाचा
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.